औरंगाबाद शहरात ८ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी ,240 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या कृत्यास मनाई
पोलिस आयुक्तालयक्षेत्रातील कलम 144 कायम

औरंगाबाद, दिनांक 23 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 (1) (3) प्रमाणे लागू केलेले मनाई आदेश कायम ठेऊन कोणत्याही व्यक्तीला औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करणारा आदेश 23 फेब्रुवारी ते 08 मार्चपर्यंत दररोज रात्री 11 ते सकाळी 06 वाजे पावेतो लागू करीत असल्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी आज निर्गमित केले आहेत.

Aurangabad Police | Home
पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता

या आदेशात पाच पेक्षा जास्त लोक जमा होऊ शकणार नाहीत. अत्यावश्यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल, आवागमन (Movement) पूर्णपणे प्रतिबंधित राहील, असेही म्हटले आहे.

 तर सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा चालू राहतील (हॉस्पीटल, क्लिनीक, मेडीकल शॉपस्), औद्योगिक कारखाने चालू राहतील, कारखान्यातील कामगार व माल वाहतूक चालू राहील. अत्यावश्यक सेवा सुविधा चालू राहतील. पेट्रोल पंप सुरु राहतील. माल व मालवाहतूक या संबंधाने चढण व उतरण सेवा यांना परवानगी असेल. कॉल सेंटर कार्यालये, टॅक्सी, कार, ऑटो, ट्रान्सपोर्ट बसेस यांना परवानगी राहील.

सदर आदेश पोलीस, आरोग्य, अत्यावश्यक सेवा (उदा. वीज, पाणी पुरवठा, दळणवळण, दूरसंचार) अत्यावश्यक वस्तू व सेवा यांची वाहतुक, कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापन या मधील अधिकारी व कर्मचारी, तसेच जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व पोलिस आयुक्तालयाच्यावतीने परवानगी दिलेल्या व्यक्ती यांना लागू नसतील. मात्र त्यांनी त्यासाठी त्यांचे ओळखपत्र व सदर विशेष कार्यासाठी नेमणुकीबाबतचे आदेश सोबत बाळगणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे नमूद मुभा असलेल्या सर्व व्यक्तींना त्यांचे विहित ओळखपत्र अथवा आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड इ . सोबत बाळगणे अनिवार्य राहील, असेही डॉ. गुप्ता यांच्या आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात 46650 कोरोनामुक्त, 1105 रुग्णांवर उपचार सुरू

May be an image of text that says 'CORONAVIRUS'

औरंगाबाद, दिनांक 23 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 76 जणांना (मनपा 23, ग्रामीण 53) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46650 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 240 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 49010 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1255 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1105 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (219)घाटी परिसर (4), बीडबाय पास (4),समता नगर (1),शिवाजी नगर (5), अभूषण पार्क(1),मिलिनियम पार्क (1),नारायण पुष्प सोसायटी (1), एन-2 सिडको (4), एन-3 सिडको (1), रामनगर (1), हर्सूल (2), श्रेयनगर (2), एन-4 सिडको (3),अशोक नगर (1),सिंधी कॉलनी (3),काबरा नगर (1),शिवराज कॉलनी (2), मेहेरसिंग नाईक चौक (1), व्यंकटेश नगर (1), नारळी बाग (1), चिकलठाणा (1), छत्रपती नगर (2), उल्कानगरी (1), गारखेडा (8), एन-1 (2), विजय नगर (1), समर्थ नगर (1), एन-12 सिडको (1), जटवाडा रोड परिसर (3), रामेश्वर नगर (1), मयूरपार्क (2), हडको (5), सातारा परिसर (6), रेणूका नगर (1), एमजीएम हॉस्पिटल (1), राज हाइट्स् (1), शुभश्री कॉलनी (1), निशांत पार्क (2), प्रोझोन मॉल (1), देवनगरी (2), पारिजात नगर (4), नंदनवन कॉलनी (1), पेन्शनपुरा (1),एअरपोर्ट परिसर (1), सुराणा नगर (1), खडकेश्वर परिसर (2), एन-9 (6), शिवकॉलनी (1), न्यायनगर (2), अजब नगर (1), एन-13 (1),हनुमान नगर (1), एन-5 (4),जवाहर कॉलनी (1), पोलीस लाईन (1), सावरकर चौक (1), अंगुरी बाग (1), जालान नगर (2), उत्तम नगरी (2), उस्मानपुरा (1),औरंगापुरा (1), पैठण रोड (1)खिंवसरापार्क (1),अविष्कार कॉलनी (1),प्रियदर्शनी कॉलनी (1), लड्डा कॉलनी (1), सदगुरु नगर (1), पदमपुरा (2), निराळा बाजार (4), शहानुरवाडी (1), कासलीवाल मार्बल (1), एन-1 (3), इएसआय हॉस्पीटल परिसर (1), संभाजी कॉलनी एन सहा सिडको (1), एन आठ गिरीजा नगर (1), आईसाहेब नगर, पिसादेवी रोड, हर्सुल (1), म्हाडा कॉलनी (1), एन बारा हडको (1), साई नगर, सातारा परिसर (1), फ्लेमिंगो हा.सो. चिकलठाणा (1), आदित्य नगर (1), विश्वकर्मा हा.सो. (1), शिवशंकर कॉलनी, बालाजी नगर (1), जय भवानी नगर (1), राधामोहन कॉलनी (1), मिरा नगर, पडेगाव (1), पिसादेवी (1), ज्योती नगर (1), म्हाडा कॉलनी, प्रताप नगर (1), वेदांत नगर (1), साईनाथ किराणा, नारळीबाग (2), अंबा अप्सरा चित्रपटगृहा जवळ (1), साई मंदिर परिसर, पद्मपुरा (1), नारळीबाग (4), अरूणोदय कॉलनी (1), नक्षत्रवाडी, पैठण रोड (1), बेगमपुरा (1), अन्य (54)

ग्रामीण (21)पिंपळवाडी, पैठण (1), सिडको महानगर (2), वाळूज, महानगर (1), बजाजनगर (5), बन्सोड क्लासेस परिसर, शरणापूर (1), अन्य (11)