औरंगाबाद जिल्ह्यात 132 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,एकाचा मृत्यू

जिल्ह्यात 46574 कोरोनामुक्त, 941 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 22: औरंगाबाद जिल्ह्यात आज 111 जणांना (मनपा 104, ग्रामीण 07) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46574 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 132 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 48770 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1255 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 941 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (113)अयोध्या नगर (1), एन-9 एम 2 (6), सिंधी कॉलनी (1), आयजीटीआर सिडको (1), बीड बायपास परिसर (2), जयोती नगर (3), टिळक नगर (1), शहागंज (1), हुसेन कॉलनी (1), एन 4 सिडको (3), उल्कानगरी (3), पारिजात नगर (1), टीव्ही सेंटर (1), प्रतापगड नगर (1), उत्तरानगरी चिकलठाणा (1), सावित्री नगर चिकलठाणा (1), त्रिमूर्ती चौक (1), एन-1 (1), ज्युब्ली पार्क (1), फरहाद नगर (2), मुकुंदवाडी (1), हिमायत नगर (1), त्रिवेणी नगर (1), पुंडलिक नगर (1), मयुरबन कॉलनी (2), श्रेय नगर (2), बन्सीलाल नगर (1), वसुंधरा कॉलनी (1), एसबी कॉलनी (1), नारळीबाग (2), तोफखाना, छावणी (3), पहाडसिंगपुरा (1), एन-2 सिडको (2), जय भवानी नगर (2), भगतसिंग रोड (1), गारखेडा परिसर (3), गजानन नगर (1), न्यू हायस्कूल परिसर (1), एन 11 (2), जटवाडा परिसर (2), सप्तश्रृंगी कॉलनी (2), प्रतापगड नगर (1), उत्तरानगरी (2), शांतीनिकेतन कॉलनी (2), सुरेश भवन किराणा (1), वेदांत नगर (2), खडकेश्वर परिसर (1), सन्मित्र कॉलनी (1), औरंगपुरा (1), निराला बाजार (1), एन सहा (1), सिडको परिसर (1), गादिया विहार (3), म्हाडा कॉलनी (1), कासलीवाल मार्बल, बीड बायपास (1), दर्गा रोड, डीमार्ट जवळ (1), सूतगिरणी चौक परिसर (1), कांचनवाडी (2), बालकृष्ण मंदिर परिसर, औरंगपुरा (2), हर्सुल सावंगी (1) हंसराज कॉम्प्लेक्स नागेश्वरवाडी (1), पटवर्धन हॉस्पीटल परिसर, रेल्वे स्टेशन रोड (1), क्रांती नगर, कोकणवाडी (1), पद्मपुरा (1), ठाकरे नगर (1), हिरालाल चौक (1), एन सात (1), विजयंत नगर,देवळाई रोड (1), जालन नगर (1), अन्य (12)

ग्रामीण (19)एसबी हायस्कूल बिडकीन (5), सिडको महानगर (1), बजाजनगर (2), मिटमिटा (1), चित्तेगाव, पैठण (1), अन्य (9)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत कैलास नगरातील 68 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.