शिवसेनेचा निष्ठावान अनंतात विलीन होऊन तारा झाला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनंत तरे याना श्रद्धांजली

मुंबई, दि 22 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार अनंत तरे यांच्या निधनाबद्धल दुःख व्यक्त केले आहे.

Maharashtra report finds every 2nd tribal officer in state a fake

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, “शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक अनंत तरे गेले, कोविड योद्धा अखेर कोविडने आपल्यातून हिरावून नेला, अनंत तरे म्हणजे ठाण्यातला सच्चा कार्यकर्त्ता. शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी द्यायची आणि अनंत तरे यानी ती निभावायची आणि त्याना सर्व कोळी समाजातील बांधवांनी , शिवसैनिकानी साथ द्यायची हे जणू ठरलेले समीकरणच. ठाण्याचे महापौर पद असो, एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष पद असो, लोकसभा निवडणुकीत मिळालेली उमेदवारी असो की ठाण्यातील संघटनेचे कोणतेही काम असो; अनंत तरे नेहमी पुढे, शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आज अनंतात विलीन झाला आणि खरेच तारा म्हणून आकाशगंगेत सामावला. अनंता आता तुला कोण पाहू शकणार नाही पण तुझी स्मृती कायम आम्हा शिवसैनिकांच्या स्मरणात राहील, खरच अनंत तरे यांच्या निधनाने शिवसेना कुटुंबातील एक तारा निखळला, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.” अशा दुःखद भावना व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.