दैनंदिन रुग्णसंख्यावाढीकडे काटेकोर लक्ष देण्याच्या राज्यांना केंद्राच्या सूचना

RT-PCR निदान चाचण्यांची संख्या वाढवावी
अँटीजेन चाचण्या नकारात्मक आलेल्यांचीही RT-PCR निदान चाचण्या कराव्या

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2021

भारतातील सक्रिय रूग्ण संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ दिसून येत आहे आज भारताची एकूण सक्रिय रुग्ण संख्या 1,45,634 एवढी झाली. ही संख्या भारतातील एकूण रुग्ण संख्येच्या 1.32% आहे.

उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 74% रुग्ण संख्या ही केरळ आणि महाराष्ट्रामधील आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सुद्धा दैनंदिन रुग्ण संख्येत आता वाढ दिसून येत आहे. पंजाब जम्मू काश्मीरमध्येही दैनंदिन नवीन रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

गेल्या चार आठवड्यात केरळमध्ये सरासरी साप्ताहिक रुग्ण संख्येत 42,000 वरून 34800 एवढी घट झाली होती. त्याचप्रमाणे गेल्याच आठवड्यात केरळमधील साप्ताहिक उपचाराधीन रुग्ण संख्या 13.9% वरून 8.9%. पर्यंत घसरली होती. केरळात आलापुझा जिल्ह्यात साप्ताहिक उपचाराधीन रुग्णसंख्या दर 10.7% पर्यंत वाढला आहे. आणि साप्ताहिक रुग्णसंख्या 2,833. एवढा वाढली आहे हा चिंतेचा विषय आहे.

महाराष्ट्रात गेल्या चार आठवड्यांमध्ये साप्ताहिक रुग्ण संख्यावाढीचा कल दिसून येत आहे. साप्ताहिक रुग्णसंख्या 18,200 वरून 21,300 पर्यंत पोहोचली आहे. याशिवाय सक्रिय रुग्णसंख्या 4.7% पासून 8%.पर्यंत वाढली आहे. मुंबई उपनगर परिसरात साप्ताहिक केसेस 19%.ने वाढल्या आहेत ही चिंतेची गोष्ट आहे. नागपूर, अमरावती, नाशिक, अकोला व यवतमाळ, येथे साप्ताहिकक रुग्णसंख्येत अनुक्रमे 33%, 47%, 23%, 55% आणि 48%, अशी वाढ झाली आहे.

कोविड-19 संसर्गाच्या बाबतीतील पंजाबची स्थिती वेगाने गंभीर होत आहे. गेल्या चार आठवड्यात साप्ताहिक सक्रिय रुग्णसंख्या दर 1.4% वरून 1.6% वर पोचला, असून गेल्या आठवड्यातील रुग्णसंख्येत 1300 वरून 1682  एवढी वाढ झालेली आहे. एसबीएसनगर या एकाच जिल्ह्यात साप्ताहिक रुग्णसंख्या दर 3.5% वरून 4.9% पर्यंत वाढला आहे. आणि साप्ताहिक रुग्ण संख्या दुपटीने म्हणजेच 165 वरून 364 एवढी वाढलेली आहे.

पाच राज्य आणि  केंद्रशासित प्रदेशात साप्ताहित रुग्ण संख्या दर हा राष्ट्रीय रुग्ण संख्येच्या सरासरीहून जास्त आहे. राष्ट्रीय रुग्ण संख्या सरासरी 1.79%. टक्के आहे. महाराष्ट्राचा सर्वाधिक साप्ताहिक रुग्ण संख्या दर 8.10% आहे.

या सर्व राज्यांना काही महत्त्वाच्या बाबींवर काम करण्यास केंद्राने सुचवले आहे या गोष्टी खालील प्रमाणे.

  1. RTPCR निदान चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करून एकूणच निदान चाचण्या वाढवाव्यात.
  2. सर्व नकारात्मक रॅपिड निदान चाचण्यांनंतरही .  RTPCR चाचण्या करून घ्याव्यात, जेणेकरून चाचण्या नकारात्मक आलेले रुग्णसुद्धा वगळले जाणार नाहीत.
  3. निवडक जिल्ह्यांमध्ये कडक आणि सर्वंकष सर्वेक्षणावर भर द्यावा तसेच कंटेनमेंट नियम कडकपणे राबवावेत.
  4. नवीन बदलत्या विषाणू स्ट्रेन बाबत चाचण्या आणि जीनोम सिक्वेन्स मॅप द्वारे नियमित दक्षता बाळगावी त्याच प्रमाणे रुग्ण संख्येच्या बाबतही दक्षता बाळगावी.
  5. अधिक मृत्यू संख्या नोंदवणाऱ्या जिल्ह्यांमध्ये उपचारात्मक व्यवस्था राबवण्यावर भर द्यावा.

कोविड लसीकरणाच्या बाबतील भारतातील एकूण लसीकरणाने 1.10 कोटींचा टप्पा पार केला आहे.

एका तात्पुरत्या अहवालानुसार लसीकरण मोहिमेत 18 फेब्रुवारी 2021, सकाळी 8.00 वाजेपर्यत 1,10,85,173 लसीकरणाच्या मात्रा 2,30,888 सत्रांमधून देण्यात आल्या.

त्यापैकी 63,91,544 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा 9,60,642 ला दुसरी मात्रा आणि 37,32,987  अग्रभागी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा देण्यात आली.

13 फेब्रुवारी 2021 पासून पहिल्या मात्रेनंतर 28 दिवस झालेल्या लाभार्थ्यांना लसीच्या 2ऱ्या मात्रा देण्यास आरंभ झाला.. आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी 2 फेब्रुवारी 2021 पासूम लसीकरण सुरू झाले आहे.

लसीकरण मोहिमेच्या (21 फेब्रुवारी 2021) 36 व्या दिवशी  4,32,931 लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 2,56,488 लाभार्थ्यांना 8,575 सत्रांमधून पहिली मात्रा (आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी काम करणारे कर्मचारी) देण्यात आली आणि 1,76,443 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाची दुसरी मात्रा देण्यात आली.

लसीकरणाच्या दुसरी मात्रा मिळालेल्यांपैकी 60.04% लोक 7 राज्यांमधील आहेत. फक्त कर्नाटकातच 11.81% लसींच्या मात्रा दिल्या गेल्या (1,13,430 मात्रा).

आतापर्यंत एकूण 1.06 कोटी (1,06,67,741) लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 11,667 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.27 टक्के इतका दर हा जगातील उच्च दरांपैकी एक आहे.

नव्याने बरे झालेल्यांपैकी 81.65% टक्के रुग्णसंख्या ही 5 राज्यांमधील असल्याचे नोंदले गेले आहे.

केरळमध्ये नव्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे 5,841 इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासात 2,567 इतके रुग्ण बरे झाले आहेत, तर त्यामागे नंबर लावणाऱ्या तामिळनाडूमध्ये बरे झालेल्यांची संख्या 459 इतकी आहे.

नवीन रुग्ण संख्येपैकी 85.61% टक्के रुग्णसंख्या ही 5 राज्यांमधील आहे.महाराष्ट्रात सातत्याने नव्याने मोठी रुग्णसंख्या आढळत आहे.  ती संख्या आता 6,281इतकी आहे. त्यानंतर केरळमध्ये 4,650 इतकी तर कर्नाटकमध्ये 490 नवीन रुग्णांची नोंद आहे. केवळ महाराष्ट्र आणि केरळमध्ये एकूण रुग्णसंख्येच्या 77% इतकी नवीन रुग्णसंख्या आहे.

24 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधून गेल्या 24 तासात कोविड 19 च्या मृत्यूची एकही नोंद झालेली नाही. यामध्ये गुजराथ, ओदिशा, जम्मू आणि काश्मिर (केंद्रशासित प्रदेश), आंध्रप्रदेश, हिमाचलप्रदेश, लक्षद्वीप, मणीपूर, मिझोराम, सिक्किम, लडाख(केंद्रशासित प्रदेश), नागालँड,  अंदमान आणि निकोबार बेटे, त्रिपुरा उत्तराखंड, अरूणाचल प्रदेश दीव व दमण आणि दादरा नगरहवेली यांचा समावेश आहे.

गेल्या 24 तासात एकूण 101 मृत्यूंची नोंद झाली आहे.

नवीन मृत्यूपैकी 80%  मृत्यू पाच राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (40) इतकी नोंद आहे. केरळमध्ये13 तर पंजाबमध्ये अजून 8 मृत्यूंची नोंद झाली आहे.गेल्या 24 तासांमध्ये फक्त एकाच राज्यात 20 पेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली. 10 ते 20 मृत्यूंची नोंद एका राज्यात 6 ते 10 मृत्यूसंख्या दोन राज्यांमध्ये तर 10 राज्यांमध्ये 1 ते 5 मृत्यूसंख्या नोंदवली गेली.