औरंगाबाद शहरातील शाळा आजपासून २८ फेब्रुवारीपर्यंत बंद 

शहरातील फक्त 10 वी आणि 12 वी चे वर्ग प्रत्यक्ष सुरु राहतील .

औरंगाबाद, दिनांक 18 :कोव्हिड 19 च्या वाढत्या पादुर्भावामुळे   दिनांक 19 फेब्रु 2021 ते 28 फेब्रु 2021 या कालावधीत  इयत्ता  5 वी  ते 9 वी आणि 11 वी चे वर्ग ( 10 वी व 12 वी वगळून) बंद करण्यात येत आहेत . पूर्वी सारखे online शिक्षण या वर्गाचे सुरु ठेवावे व शालेय कामकाज पूर्वीप्रमाणे चालू राहील अशा सूचना मा प्रशासक तथा मा आयुक्त महोदय यांच्या आहेत त्या नुसार शहरातील फक्त 10 वी आणि 12 वी चे वर्ग प्रत्यक्ष सुरु राहतील .

पोलीस आयुक्त श्री. गुप्ता यांनी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना खबरदारी घेत नियमांचे पालन करत जयंती साजरी करण्याचे आवाहने केले. तसेच पुन्हा लॉकडॉऊन लावण्याची वेळ येणे योग्य ठरेल काय याचा गांभिर्याने विचार करुन प्रत्येकाने खबरदारी बाळगत नियमांचे पालन करुन प्रशाासनाला सहकार्य करावे. दुसऱ्या संसर्गाच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गाफील न राहता सतर्कता बाळगण्याचे आवाहन श्री. गुप्ता यांनी केले.

मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी शहरात आतापर्यत 30 हजार 544 रुग्ण बरे झाले असून यंत्रणांना आता कोरोना संकटाचा अनुभव आलेला आहे. त्या दृष्टीने सर्व प्रतिबंधात्मक कार्यवाही, उपाययोजनांसह यंत्रणा सज्ज आहे. नागरीकांनी मास्क वापरुन कोवीड नियमावलीचे योग्य पालन केले तर रुग्ण संख्या वाढणार नाही. संसर्गाला आपण रोखू शकू, असे सांगून वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरातील 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यां व्यतिरीक्त इतर वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची सवलत 28 फेब्रुवारीपर्यत देण्यात येत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे चाचण्यांची सुविधा सुरु असून रेल्वे, बस स्थानकावरही चाचण्या सुरु आहेत. तरी जनतेने नियम पाळत स्वत:सह शहरालाही सुरक्षित ठेवण्याची गरज असून रुग्ण वाढीनुसार प्रतिबंधात्मक  उपाय वाढवण्यात   येतील, असेही श्री. पांडेय यावेळी म्हणाले.

पोलीस अधिक्षक श्रीमती पाटील यांनी मास्क ही संरक्षक ढाल असून प्रत्येकाने स्वंयस्फुर्तीने त्याचा वापर करावा, असे आवाहन यावेळी केले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मुलीच्या विवाह निमित्त दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी हॉटेल अजंता ॲम्बेसेडर येथे नियोजित कार्यक्रम संसर्गाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी यांनी रद्द केला असून या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवलेल्या सर्वांना जिल्हाधिकारी यांनी आपापल्या घरूनच शुभेच्छा देण्याचे सांगितले आहे.