‘पेट’संदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

औरंगाबाद, दिनांक 18 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्पेâ घेण्यात येणाNया ‘पेट’चा दुसरा पेपर विद्याथ्र्यांना घरुन देण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे  न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने फेटाळली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. ‘पेट’चा पहिला पेपर ३० जानेवारी रोजी घेण्यात आला. सदर पेपर ऑनलाईन पध्दतीने घरी राहून घेण्यात आला. तथापि या पेपरला विद्याथ्र्यांनी गैरप्रकार केल्याचा काही तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या होत्या. यावर पेट दुसरा पेपर विद्याथ्र्यांनी ऑनलाईन पध्दतीनेच तथापि घरुन परिक्षा देण्याऐवजी परीक्षा केंद्रावरुन घेण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे.
या निर्णयास मोहम्मद यासीन व अतुल राजेंद्र कांबळे यांनी उच्च न्यायालयाच्या येथील खंडपीठात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते. विद्याथ्र्यांना ‘पेट’चा दुसरा पेपर सेंटरऐवजी घरुन घ्यावेत असे विद्यापीठास आदेशित करावे, असे याचिकेत म्हटले होते. तथापि शासन निर्णयाप्रमाणे ‘कोविंड संदर्भात सर्वाेतोपरी उपायोजना करुन सदर परीक्षा घेण्यात येईल, असे विद्यापीठाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर खंडपीठाने या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका निकाली काढली. विद्यापीठातर्पेâ सिध्देश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले. विधि अधिकारी किशोर नाडे यांनी त्यांना सहकार्य केले. याचिकाकत्र्यांतर्पेâ तबरेजुद्दीन कादरी यांनी काम पाहिले.