सामर्थ्य प्रिमियर लीग:एएसआर, आरके, दिग्विजय संघ विजयी
औरंगाबाद, दिनांक 17 : ‘सान्या सामर्थ्य प्रिमियर लीग’मध्ये चौथ्या दिवशी झालेल्या सामन्यामध्ये एएसआर इंडस्ट्री, आर.के. वॉरिअर्स आणि दिग्विजय स्टायकर्स संघांनी टुल टेक ॲकेडेमिया, चंद्रा मीडिया इलेव्हन आणि बालाजी वॉरिअर्स संघावर विजय मिळवला. दिवसभरात झालेल्या तिन्ही स्पर्धेत गजानन भानुसे, रविंद्र बोडखे, प्रदीप चव्हाण यांनी सामनावीराचा मान पटकावला.
एमजीएमच्या क्रिकेट मैदानात बुधवारी (ता. १७) सामने खेळवण्यात आले. टुल टेक ॲकडेमिया संघाने १५ षटकात आठ बाद ११३ धावा केल्या होत्या. सुरज जाधव यांनी २८ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. अच्युत भोसले (२०), रविंद्र काळे (१७) योगदान दिले. रोहन हंडीबाग यांनी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात एएसआर इंडस्ट्रीच्या संघाने गजानन भानुसे यांनी ४३ चेंडूत ७७ धावा काढल्या. मंगेश गरड (१५). कमलेश (१४) यांनी हे आव्हान चार गड्यांच्या बदल्यात १३.४ षटकात पुर्ण केले.
दुसऱ्या सामन्यात चंद्रा इलेव्हनच्या अमोल कोल्हे यांनी ३३ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. विजय भुजाडी (२०), संदीप (१७) आणि अतुलने नाबाद दहा धावा काढत साथ दिली. संघाला नऊ बाद ११० धावांपर्यंत मजल मारता आली. शशांक चव्हाण यांनी तीन तर राजेंद्र मगर आणि कदम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात आर.के. वॉरिअर्स संघाच्या रविंद्र बोडखे (४३), संजय बनकर (३६) आणि भास्कर जिवरग (१५) यांनी १४ षटकात चार गड्यांच्या बदल्यात विजय मिळवला. विजय भुजाडी आणि राम शिनगारे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
बालाजी वॉरिअर्सच्या संघाने तिसऱ्या सामन्यात चार बाद १२८ धावांची खेळी केली. अजय देशमुख (३७), अभय भोसले (३९), अक्षय गायकवाड (२०) समीर सोनवणे (१३) यांनी योगदान दिले. प्रदीप चव्हाण यांनी तीन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात दिग्विजय स्ट्रायकर्सचा संघाने १४.५ षटकात १२९ धावा करत विजय मिळवला. पांडुरंग धांडे (५०), प्रदीप चव्हाण (३४), रामेश्वर रोडगे (२२) यांनी चांगली खेळी केली. समीर सोनवणे आणि अतुल वालेकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.