औरंगाबादकरांनो सावधान,करोना रुग्णांची संख्या पुन्हा शतकपार 

औरंगाबाद जिल्ह्यात 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 47 जणांना (मनपा 39, ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46190 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47842 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1245 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 407 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (96)बीड बायपास (4), हनुमान नगर (1), गजानन कॉलनी (1), एन-4 सिडको (4), सेव्हन हिल (1),टिळकनगर (1), मित्रनगर (2), सिद्धार्थ नगर (1), सिडको एन-5 (1), एन-9 (3), सातारा परिसर (5),शिवाजी नगर (2), शास्त्रीनगर (3), रमानगर (1), एन-7 (1), इंडोजर्मन टुल रूम (1), एन-1 सिडको (2), एन-2 सिडको (2), नारेगाव (1), जालान नगर (2), कांचनवाडी (4), उल्कानगरी (1), म्हाडा कॉलनी (1), इटखेडा (1),घाटी परिसर (2), गारखेडा (2), क्रांती चौक (3), जवाहर कॉलनी (1), नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलनी (1), हिमायत बाग (1), योगीराज टॉवर (1), रोशन गेट (1), मथुरा नगर (1), उस्मानपुरा (3), जय भवानी नगर (1), सुंदर नगर पडेगाव (1), श्रेय नगर (1), अन्य (31)

ग्रामीण (24)जळगाव (1), शेंद्रा एमआयडीसी (1), वाळूज (1), बजाज नगर (3), फुलंब्री (1), कन्नड (2),सौजन्य नगर वाळूज (1), अन्य (14)