रेयॉन सामर्थ्य, साई ॲडव्होकेटस् संघ विजयी

सान्या सामर्थ्य क्रिकेट लीगचा पहिलाच सामना बरोबरीत

औरंगाबाद : ‘सान्या सामर्थ्य प्रिमियर लीग’चा पहिलाच सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या सामन्यात रेयॉन सामर्थ्य वॉरिअर्स आणि साई ॲडव्होकेटस् डॉमिनेटर्स संघांनी विजय मिळवले. एमजीएमच्या क्रिकेट मैदानात रविवारी स्पर्धेला सुरवात झाली. डॉ. रविंद्र काळे, डॉ. अमित राजळे, अजय शितोळे यांनी सामनावीराचा मान पटकावला. 

Displaying IMG_4862.JPG

सामर्थ्य प्रतिष्ठानतर्फे तिसरी एसपीएल होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना टुल टेक ॲकेडेमिया आणि दिग्विजय स्ट्रायकर्स यांच्यात झाला. दिग्विजय स्ट्रायकर्सकडून आमले यांनी ३१ धावा, तर प्रदीप यांनी १५ धावा काढल्याने संघाने १५ षटकात ९ बाद ९६ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात टुल टेकच्या प्रविण महाडिक यांनी २३ धावा, सुरज जाधव (३३) डॉ. रविंद्र काळे (२४) यांच्या खेळीसह संघाने निर्धारित षटकात पाच बाद ९६ धावा काढल्या. डॉ. काळे यांनी तीन गडी बाद केले. यामुळे हा सामना बरोबरीत राहिला. साखळी सामन्यात सुपर ओव्हर नसल्याने दोन्ही संघांना समान गुण देण्यात आले. 

Displaying IMG_4893.JPG


दुसऱ्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना रेयॉन सामर्थ्य वॉरिअर्सने निर्धारित षटकात तीन बाद १५१ धावांचा डोंगर उभारला. सुनिल हिवाळे यांनी 20 धावा कुंदन देशमुख (३३) डॉ. अमित राजळे यांनी (51) तर, अभिषेक शेळके यांनी १८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात चंद्रा मीडिया इलेव्हनने चांगलीच लढत दिली. विजय भुजाडी यांनी १० चेंडूत ३१ धावांची वादळी खेळी केली. शरद पठाडे यांनीही तितक्याच धावा चोपल्या. तर अमोल म्हस्के याने २० धावा काढत साथ दिली. चंद्रा मीडिया इलेव्हनने १३२ धावांपर्यंत मजल मारली. रेयॉन सामर्थ्य संघाने १९ धावांनी विजय मिळवला. 

बालाजी वॉरिअर्स आणि साई ॲडव्होकेटस् डॉमिनेटर्स यांच्यात तिसरा सामना झाला. बालाजी वॉरिअर्स संघाने १४.४ षटकात ९४ धावा काढल्या होत्या. यात अतुल वालेकर (२५), अभय भोसले (२६) यांनी योगदान दिले. तर अजय शितोळे यांनी तीन तर, जगदीश घनवट यांनी दोन गडी बाद केले. हे आव्हान साई ॲडव्होकेटस् डॉमिनेटर्स संघाने ११.३ षटकात पाच गड्यांच्या बदल्यात पुर्ण केले. अजय शितोळे यांनी १५ चेंडूत ३० धावा काढल्या. अभय भोसले यांन निखील घनवट (२३) यांनी साथ दिली. अविनाश शिंदे, अखिल भालेकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 

Displaying IMG_5081.JPG


एसपीएलचे थाटात उदघाटन

Displaying IMG_4992.JPG

स्पर्धेचे  उदघाटन एम जी एम हॉस्पिटलचे डॉ. प्रविण सुर्यवंशी यांच्याहस्ते झाले. यावेळी उद्योजक सचिन मुळे, नारायण पवार, श्रीराम शिंदे, वैभव धोंडे, श्रीधर नवघरे, संग्राम पटारे, सुनिल किर्दक, कुंदन देशमुख, रोहित नाईकवाड, अजित मुळे, टी. आर. जाधव यांची उपस्थिती होती. 

Displaying IMG_5048.JPG
रवींद्र काळे

दिग्विजय स्ट्रायकर्स -१५ षटकांत ९बाद ९६(आमले ३१,प्रदीप बाबूराव १५,रवींद्र काळे ३-०-१२-३,सुरज जाधव ३-०-२२-२)बरोबरी विरुद्ध टूलटेक इलेव्हन – १५ षटकांत ५ बाद ९६(प्रवीण महाडिक २३,सूरज जाधव ३३,रवींद्र काळे २४,कैलाश शेळके ,आमले ,मुकेश भराटे प्रत्येकी १ बळी )मॅन ऑफ दि मॅच -रवींद्र काळे

 रेयॉन सामर्थ्य  वॉरिअर्स –  १५ षटकांत ३ बाद १५१(सुनील हिवाळे ५१,अभिषेक शेळके १८,कुंदन देशमुख ३३,अमित राजळे २०,अमोल कोल्हे,विजय भुजाडी व संदीप लांडगे प्रत्येकी १ बळी ) विजयी वि.चंद्रा मीडिया – १५ षटकांत ९ बाद १३२(शरद पठाडे ३१,विजय भुजाडी ३१,अमोल म्हस्के २०,अमोल कोल्हे १३,आशिष गाडेकर ३-०-२२-२,गिरीश मोरे २-०१३-२)

Displaying IMG_5393.JPG
अमित राजळे

बालाजी  वॉरिअर्स-१४.४ षटकांत सर्वबाद ९४(अतुल भालेकर २५,अभय भोसले २६,अजय शितोळे २.४-०-१०-३,प्रल्हाद बचाटे ३-०-१७-२,जगदीश घनवट ३-०-२५-२)पराभूत वि. साई ऍडव्होकेट -११.३ षटकांत ५ बाद ९६(निखिल घनवट नाबाद २३,अजय शितोळे ३०.संदीप देगांवकर १५,ज्ञानेश्वर पाटील १४,अतुल भालेकर १-०-८-२,अविनाश शिंदे ३-०-१३-२) मॅन ऑफ दि मॅच – अजय शितोळे

Displaying IMG_5693.JPG
अजय शितोळे
Displaying IMG_5468.JPG
Displaying IMG_5091.JPG