भारतीय संघाला विजयासाठी 420 रनची गरज

Image

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना चेपक चेडियम चेन्नई येथे खेळला जात आहे. आज, सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने 257/6 पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारतीय संघाने पहिल्या डावात 95.5ओव्हरमध्ये 337 धावा केल्या. 241 धावांच्या आघाडीनंतर चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ 178 रनवर ऑलआऊट झाला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी 420 रनची आवश्यकता आहे.

चेन्नई टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या बॅट्समनना टीम इंडियाच्या बॉलर्सनी झटपट माघारी धाडले. इंग्लंडची टॉप ऑर्डर मोठी धावसंख्या उभरण्यात अपयशी ठरले.

Image

241 धावांची आघाडी मिळवल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसर्‍या डावात फलंदाजीला आला, तेव्हा पहिला धक्का डावाच्या पहिल्याच चेंडूवर लागला. रोरी बर्न्सला आर अश्विनने त्याला आऊट केले. अश्विनला त्यानंतर दुसरं यशही मिळालं. 16 धावांवर त्याने डॉम सिब्लेला माघारी पाठवलं. इशांत शर्माने तिसरी विकेट घेतली. त्याने डॅनियल लॉरेन्सला 18 रनवर आऊट केले.

इंग्लंडला बेन स्टोक्सच्या रुपाने चौथा धक्का बसला. त्याने 7 धावा केल्या आणि त्याला आर अश्विनने आऊट केलं. पाचवं यश जो रूटच्या रुपात मिळालं. त्याने 32 बॉलमध्ये 40 धावा केल्या आणि जसप्रीत बुमराहने त्याची विकेट घेतली. इंग्लंडला सहावा धक्का ओली पोपच्या रुपात लागली. त्याला शाहबाज नदीमने 28 धावांवर आऊट केले.

इंग्लंडला सातवा धक्का जोस बटलरच्या रूपात लागला. त्याने 24 धावा केल्या. डोम बेसच्या रूपात भारताला आठवं यश मिळालं. त्याने २५ रन केले. त्यानंतर जोफ्रा आर्चरने 5 आणि जेम्स अँडरसन शुन्यावर आऊट झाला.

भारतीय संघाच्या दुसर्‍या डावाच्या सुरूवातीलाच लीचने रोहीत शर्माला त्रिफळाचित केले. रोहीत शर्माला २० चेंडूत १२ धावा काढता आल्या. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने २३ चेंडू १२ धावा आणि शुभमन गिल ३५ चेंडू १५ धावा काढत मैदानात खेळत आहेत. भारताला हा कसोटी सामना जिंकण्यासाठी ४२० धावांचा पल्ला ओलांडावा लागणार आहे.
 
 
 
ही धावसंख्या जर भारताने पूर्ण केली तर भारताच्या नावे आणखी एका विक्रमाची भर पडणार आहे. यापूर्वी अशी कामगिरी वेस्टइंडीज संघाने पूर्ण केली आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात २००३ मध्ये ४१८ धावा ठोकल्या होत्या. इंग्लंडच्या दुसर्‍या डावाची सुरूवात खराब झाली. संघाने डावाच्या पहिल्या चेडूंवर बर्न्स बाद झाला. अश्विने त्याला शून्यावर बाद केले. सिबली १६ धावांवर बाद झाला त्याने रविचंद्रनच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराच्या हाता झेल बाद झाला.
 
 
 
त्यानंतर आलेल्या डैलियन लॉरेंस पण काही चांगली कामगीरी करता आली नाहीतो १८ धावा करून इशांतर शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडला एका पाठोपाठ एक धक्के बसले त्यामुळे ४६.३ षटकात इंग्लंडचा संघ १७८ धावांपर्यत पोहचू शकला. कसोटी कराकिर्दीत इंशात शर्मा ३०० बळी घेणारा भातरताचा सहावा गोलंदाज ठरला आहे त्याने लॉरेंसचा बळी घेत आपल्या ३०० बळींचा टप्पा पूर्ण केला.
 
 

पाचवा दिवसाचा खेळ दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भारताला विजयासाठी ३८१ धावांची गरज आहे तर इंग्लंडला भारताच्या नऊ गड्यांना माघारी पाठवण्याची मोठी कामगीरी करावी लागणार आहे. त्यामुळे पाचवा दिवसाचा खेळ कोणत्या संघाच्या पारड्यात पडतो हे पहाणे गरजेचे होणार आहे.