भारतीय संघासमोर 321 धावांचं लक्ष्य

चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांपैकी पहिला सामना आज थांबवण्यात आला. तिसऱ्या दिवसाअखेरपर्यंत भारतीय संघाचे 6 गडी बाद तर 257 धावा झाल्या आहेत. भारतासमोर अजूनही 321 धावांचं आव्हान आहे. उद्या भारतीय संघातील उर्वरित 4 फलंदाजांवर ही मोठी कमान असणार आहे. हा सामना जिंकण्याचं मोठं आव्हान भारतीय संघासमोर आहे. 

Image

इंग्लंडनं मोठा पल्ला गाठत तिसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत 578 धावा केल्या आणि सर्व गडी बाद झाले. त्यानंतर भारतीय संघाने फलंदाजीला सुरुवात केली. पहिल्याच टप्प्यातील भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. रोहित शर्मा अवघ्या 6 धावांवर बाद झाला आणि तंबूत माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली आणि एकामागोमाग एक बाकी तंबूत परतले. 

अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांच्या खांद्यावर उर्वरित खेळाची कमान चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला असणार आहे. आजचा खेळ थांबवण्यात आला असून अश्विननं 8 तर सुंदरने आतापर्यंत 33 धावा काढल्या आहेत. या दोघांकडूनही भारतीय संघालाच नाही तर क्रिकेटप्रेमींनाही मोठी आशा आहे.

Image

वॉशिंगटन सुंदर आणि रविचंद्रन अश्विन नॉटआऊट आहेत. उद्या पुन्हा ते खेळायला मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघानं सुरुवातीच्या धक्क्यांनंतरही 74 ओव्हरमध्ये 6 गडी गमावत 257 धावा केल्या. त्यानंतर भारताला पहिला सामना खिशात घालण्यासाठी किमान 322 धावांची आवश्यकता आहे.

Image

ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या आहेत. अवघ्या शतकापासून 9 धावा दूर असताना गोलंदाज डोमनिक बेसने ऋषभला आऊट करत तंबूत धाडले. सर्व क्रिकेटप्रेमी त्याच्या शतकाची वाट पाहात असतानाच आऊट झाल्यानं मोठी निराशा झाली. तरीही ऋषभने सर्वाधिक रन करत भारतीय संघाला मजबूती देण्याचा प्रयत्न केला.