त्याग, समर्पण, सेवाभावामुळेच समाज जिवंत राहतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ठाणे येथील ३० कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

मुंबई, दि. 6 : संकट प्रसंगी इतर देशात लोक सरकारवर विसंबून राहतात. भारतात मात्र जनसामान्य लोक आपापसातील मतभेद विसरून निःस्वार्थ सेवेसाठी तत्पर होतात. त्यामुळेच कोरोनासारखे संकट येऊन जगभर हाहाकार झाला तरीही भारताने त्यावर सफलतेने मात केली. भविष्यातही  कोरोनासारखी संकटे येतील आणि जातील. मात्र जोवर देशात त्याग, समर्पण व सेवेची भावना आहे, तोवर भारतीय समाज जीवंत राहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

ठाणे येथील संस्कार सेवाभावी संस्थेद्वारे राजभवन येथे कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते सेवाभावी संस्था, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांसह विविध क्षेत्रातील 30 करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्कार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर तसेच महाराष्ट्र हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे उपस्थित होते.

भारतात विविध धर्मांचे लोक एकत्र राहतात. परंतु सर्वच लोक सुसंस्कारित आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत मानून सेवा करण्याची अद्भुत भावना येथील लोकांमध्ये आहे. समाज संकटात असताना समाजसेवेत आपले देखील योगदान असावे अशी भावना येथे गरिबातील गरीब व्यक्तीमध्ये आहे. त्यामुळे आपल्या देशात कोरोना योद्ध्यांनी समर्पण भावनेने काम केले, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी माहेश्वरी मंडळ, ठाणे (सुनिल जाजु), श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म मंदीर  व न्याती ट्रस्ट ठाणे (उत्तम सोळंकी),  गौरव सेवा प्रतिष्ठान  संस्था (डॉ.राजेश माधवी), जैन सामाजिक संस्था (पंकज जैन), रामराव माधवराव सोमवंशी,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे मधूकर शिवाजी कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे  वंदना खैरे, महिला पोलीस शिपाई राहुल छगन वाघ, पोलीस शिपाई, भिवंडी सुनिल गोविंदलाल काबरा, विद्याधर अच्युत वैशंपायन, सुनेश रामचंद्र जोशी, नगरसेवक वैभव एकनाथ बिरवटकर, पत्रकार दिपक अनिल कुरकुंडे, पत्रकार अक्षय श्यामसुंदर भाटकर, पत्रकार गजानन वासुदेव हरिमकर, गणेश हरशिचंद्र थोरात, सुमन मोहनलाल नरशाना, डॉ.सुहेल अहमेद लंबाते, डॉ.धनश्री परशुराम देशमुख, डॉ.राणी रामराव शिंदे, केतकी अभय पावगी, मयुरी संजय पटवर्धन, लक्ष्मण सुकीर सारदेकर, पांडुरंग काशिनाथ गिजे, रवींद्र सत्यनारायण रेडडी, धनंजय रामलोचन सिंग, देवेंदरजीत कौर, महेश आत्माराम विनेरकर, रोनाल्ड अंथनी आईसक, अरिफ मोहिदीन बडगुजर यांचा राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.