हिंगोलीत सहा नवीन रुग्ण आढळले

हिंगोली, दि.5: हिंगोली तालुक्यातील आंधारवाडी क्वारंटाईन सेंटर येथे भरती असलेल्या सहा व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाली आहे. 28 वर्षीय महिला आणि 11 वर्षीय मुलगा हे रिसाला बाजार येथील बाधित रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत. 33 वर्षीय पुरुष असून नगर परिषद कॉलनी येथील रहिवासी आहे. तर 30 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला व 9 वर्षांची मुलगी हे सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असून ते मुंबई येथून हिंगोली येथे आलेले आहेत.

आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 192 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 161 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात सद्यस्थितीत 31 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्ज्ञझ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.