रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयासाठी 1,18,101 कोटींच्या खर्चाची तरतूद

1,08,230 कोटीं रुपयांची, आतापर्यंतची सर्वाधिक, भांडवली तरतूद
Ministry of Road Transport & Highways, Government of India

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2021

आज संसदेत सादर झालेल्या 2021-22च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रस्तेवाहतूकीच्या  मुलभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अनेक घोषणा केल्या.   रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयासाठी  1,18,101 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाची तरतूद केली आहे. यापैकी भांडवली खर्चासाठीची तरतूद 1,08,230 कोटी असून ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे.

3.3 लाख कोटी रुपयांचे 1300 किमी लांबीच्या रस्त्यांचे जाळे याआधीच 5.35 लाख कोटींच्या भारतमाला परियोजना प्रकल्पात मंजूर झाले आहेत, व त्यापैकी 3,800 किमी लांबीचे रस्ते बांधून तयार आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी संसदेला दिली. मार्च 2022 पर्यंत आणखी 8,500 किमी रस्ते मंजूर होतील तसेच राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्पातील 11,000 किमीचे महामार्ग पूर्ण होतील.

  1. रस्ते वाहतूकीच्या मुलभूत सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने आर्थिक कॉरिडॉरच्या योजनेची आखणी होत असल्याचे सितारामण यांनी सांगीतले.
  2. केरळात राष्ट्रीय महामार्गासाठी 65,000 कोटींची गुंतवणूक, त्यामध्ये मुंबई ते कन्याकुमारी हा 600 किमी भागही समाविष्ट.
ROADS AND HIGHWAY INFRASTRUCTURE.jpg

मुख्य प्रकल्पः रस्ते व महामार्ग

नोंदवण्याजोगे 2021-22 मधील काही महत्वाचे कॉरीडॉर व इतर मुख्य प्रकल्प:

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे : 260 किमीचा राहिलेला भाग 31-3-2021 पूर्वी पूर्ण करणार.

प्रगत वाहतूक व्यवस्थापन पद्धती : स्पीड रडार्स, बदलते संदेश फलक, GPS सुविधा असलेल्या रिकवरी व्हॅन्स इत्यादी सर्व नव्या चार तसेच सहापदरी महामार्गांवर तैनात करण्यात येणार.

ROADS AND HIGHWAY INFRASTRUCTURE 1.jpg