2021 -22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शहरी भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन

नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्राकडून रु 5, 976 कोटी तसेच नाशिक मेट्रोसाठी रु 2,092 कोटी रुपयांचा निधी

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या 2021- 22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शहरी भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास करण्यावर भर दिला. शहरी बस सुविधा तसेच मेट्रो रेल्वे सुविधांच्या  द्वारा सरकारने शहरी भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सहभाग वाढवला पाहिजे असे त्या म्हणाल्या. 

सार्वजनिक बस वाहतूक सेवेच्या विकासासाठी सरकार एक नवीन योजना सुरू करत असून त्यासाठी  18 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे त्या योजनेअंतर्गत खासगी- सरकारी भागीदारीतून 20,000 बसेस चालवण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना बसेस विकत घेणे, चालवणे तसेच देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. या योजनेमुळे वाहन उत्पादन क्षेत्राला उत्तेजन मिळेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच शहरी रहिवाशांच्या वाहतुकीचा प्रश्न आणखी सहजपणे सुटेल.

Budget 2021: 'Metro Lite' and 'Metro Neo' To Boost Urban Infrastructure In  Tier-2 Cities

देशभरात मेट्रो रेल्वेचे जाळे वेगाने वाढत आहे. सध्या 702 किलोमीटर मार्गावर मेट्रो चालू आहे व शिवाय 27 शहरांमध्ये 1,016 किलोमीटरच्या मार्गासाठी मेट्रोची व आर आर टी एस ची उभारणी सुरू आहे. टियर -१ शहरांच्या आसपासच्या भागात व टियर -२ शहरांमध्ये मेट्रो लाईट व मेट्रो निओ अशा दोन नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे कमी खर्चात मेट्रो सारख्या सुविधा देण्याची सरकारची योजना असल्याचे, त्या अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या .

अर्थसंकल्पामध्ये नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्राकडून रु 5, 976 कोटी तसेच नाशिक मेट्रोसाठी रु 2,092 कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव आहे.