भारतीय वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्सटाईल पार्क (मित्रा) योजना सुरू करण्याची सरकारची घोषणा

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2021

भारतीय वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी, मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच रोजगार निर्मिती आणि निर्यातीला चालना मिळावी यासाठी सरकारने मेगा इनव्हेस्टमेंट टेक्सटाईल पार्क (मित्रा) योजना प्रस्तावित केली आहे. आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 सादर करताना केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री  निर्मला सीतारमण म्हणाल्या की उत्पादन-संलग्न  प्रोत्साहन योजने (पीएलआय) व्यतिरिक्त मित्रा सुरू केली जाईल.

केंद्रीय वस्त्रोद्योग आणि महिला व बालविकास मंत्री, स्मृती इराणी यांनी मेगा इनव्हेस्टमेंट टेक्सटाईल पार्कविषयी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मित्त्रा  हि योजना  भारतीय वस्त्रोद्योगाला कलाटणी देणारी  ठरेल .” उत्पादन-संलग्न  प्रोत्साहन योजने  बरोबरच मित्रा योजनेमुळे गुंतवणूक  आणि रोजगाराच्या संधी वृद्धिंगत होतील.

दुसर्‍या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या, “मित्राच्या माध्यमातून अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर  भर दिल्यामुले  आमच्या देशांतर्गत उत्पादकांना आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग  उत्पादकांबरोबर स्पर्धा करता  येईल ,आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊन  भारटाचा मोठा कापड निर्यातदार देश बनण्याचा मार्ग मोकळा होईल  ”