भारताचा सक्रीय रुग्णांचा दर आणखी कमी


गेल्या 24 दिवसांपासून दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक
37 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना दिले कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण


नवी दिल्ली, 31 जानेवारी 2021

भारताचा एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येचा दर सातत्याने घसरत आहे. आज तो 1.68 लाख (1,68,784) इतका खाली आला आहे.सध्याच्या सक्रीय रुग्णसंख्येत एकूण बाधित रुग्ण संख्येपैकी केवळ 1.57 टक्के रुग्ण आहेत.

31 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5,000 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 4 सक्रीय रुग्णांची नोंद आहे, तर दमण आणि दिव आणि दादरा आणि नगर हवेली येथे 6 सक्रीय रुग्णांची नोंद आहे.एकूण सक्रीय रुग्ण संख्येच्या 79.69 %  रुग्ण हे पाच राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत एकत्रितपणे भारताच्या एकूण सक्रीय रुग्ण संख्येपैकी मोठ्या प्रमाणात (69.41 टक्के) रुग्ण आहेत.

भारताची  एकत्रित रुग्ण बरे होण्याची संख्या आज 1.04 कोटी (1,04,23,125) इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 96.99 टक्के इतका आहे.गेल्या 24 दिवसांपासून, दैनंदिन रुग्ण बरे होण्याची संख्या ही दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. गेल्या 24 तासात 13,052 इतकी दैनंदिन रुग्ण संख्येची नोंद झाली आहे तर गेल्या 24 तासात 13,965 इतकी बरे झालेल्या आणि घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आहे.

देशभरात सुरू असलेल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेमध्ये 31 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, एकूण 37.44 लाख (37,44,334) लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.गेल्या 24 तासात 2,44,307 आरोग्य कर्मचाऱ्यांना 5,275 केंद्रांवर लस देण्यात आली आहे.आतापर्यंत 68,962 लसीकरण सत्र घेण्यात आली आहेत.

दररोज लसीकरण करणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत प्रगतीशील वाढ दिसून आली आहे.देशभरात लसीकरण मोहिमेच्या लसींच्या संख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर, भारत पाचव्या स्थानावर (29 जानेवारी 2021 रोजी) आहे. अनेक देशांच्या  लसीकरण मोहिमेची सुरवात भारताच्या अगोदरच झाली आहे हे विशेष.लसीकरण घेतलेल्या एकूण लाभार्थ्यांपैकी 63.34 टक्के लाभार्थी 8 राज्यांमधील आहेत.लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची जास्तीत जास्त संख्या उत्तरप्रदेशमध्ये आहे, त्यानंतर राजस्थान आणि कर्नाटक यांचा क्रम लागतो.

नव्याने बरे झालेल्या रुग्ण संख्येपैकी 85.72 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.केरळमध्ये एका दिवशी मोठ्या संख्येने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7,032 इतकी आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 1,535 रुग्ण बरे झाले आहेत, तर त्यानंतर कर्नाटकमधील संख्या 547 इतकी आहे.

नवीन रुग्ण संख्येच्या नोंदीपैकी 83.72 टक्के रुग्ण संख्या 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 6,282 इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 2,630 इतकी तर तामिळनाडू मध्ये 505 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.गेल्या 24 तासांत 127 मृत्यूंची नोंद झाली आहे.

दैनंदिन मृत्यूंपैकी 74.02 टक्के मृत्यूंची नोंद सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (42) मृत्यू नोंदविले गेले. त्यानंतर केरळमध्ये दैनंदिन मृत्यूंमध्ये 18 इतकी नोंद आढळते तर पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 9 मृत्यू नोंदविण्यात आले.