मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या तापमानात घट

गेल्या चोवीस तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल सोलापूर इथं ३५ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. 

येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतेक सर्व ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर   मराठ्वाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.कोकणात तुरळक ठिकाणी काल हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ होतं.
 मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं होतं. येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. उद्यापर्यंत किनारपट्टीलगतच्या भागात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *