जालना जिल्ह्यात 29 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना दि. 31 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 2 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –13, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, परतूर तालुक्यातील सतोना 01, अंबा01, घनसावंगी तालुक्यतील पेनवाडी शेलगाव 01,अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, शहागड-1,पाथरवाला 01,बदनापुर तालुक्यातील बदनापुर पाथर देलगाव 01, जाफ्राबाद तालुक्यातील टेभुर्णी 01, बोरखेडी 01, आरदखेडा 01 भोकरदन तालुक्यातील मानपुर 01, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3, बीड 01 आरटीपीसीआरद्वारे 29 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 29 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19877 असुन सध्या रुग्णालयात-93 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6966 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.476 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-117520 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -29 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13749 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-103320 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 124, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6667

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 12, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6532 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -10, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-93,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-02, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-13159,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-223 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-199475 मृतांची संख्या-367

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन एक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली