नांदेड जिल्ह्यात 39 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

नांदेड दि. 30:-शनिवार 30 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 39 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 35 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 4 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 1 हजार 361 अहवालापैकी 1 हजार 301 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 502 एवढी झाली असून यातील 21 हजार 394 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 319 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शनिवार 30 जानेवारीला सन्मित्रनगर नांदेड येथील 58 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 586 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 29, खाजगी रुग्णालय 5, मुखेड कोविड रुग्णालय 2, गोकुंदा कोविड रुग्णालय 2 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.07 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 9 हजार 943एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 83 हजार 122एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 502एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 394एकुण मृत्यू संख्या-586उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.07 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14 आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-07आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-319आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-08.