खरीप विपणन हंगाम 2020-21 साठी आधारभूत किंमतीने झालेले व्यवहार


किमान आधारभूत मूल्याने 2,6,23,528  कोटी रूपये मोजून कापसाच्या 8970424 गाठी (गासड्या) खरेदी; 18,47,662 कापूस उत्पादकांना लाभ

खरीप पिकांचा 2020-21 चा विपणन हंगाम सुरू आहे. मागील हंगामाप्रमाणेच यंदाही किमान आधारभूत मूल्यानुसार सरकारने खरीप 2020-21 च्या हंगामामध्ये अन्नधान्य खरेदीचे व्यवहार किमान आधारभूत मूल्य देवून सुरू ठेवले आहेत.

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये तांदळाची खरेदी निरंतर होत असून व्यवहार सुरळीत चालू आहेत. वेगवेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून तांदळाची आवक होत आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदिगड, जम्मू आणि काश्मिर, केरळ आणि गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये दि. 29.01. 2021 पर्यंत 596.98 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त तांदळाची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळापर्यंत 501 .97 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी झाला होता. यंदा तांदळाच्या खरेदीमध्ये 18. 92  टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एकूण 596.98   लाख मेट्रिक टन तांदूळ  खरेदीपैकी एकट्या पंजाबमध्ये 202.77 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी झाला आहे. हे प्रमाण देशाच्या एकूण खरेदीपैकी 33.96 टक्के  आहे.

1.JPG