मुंबई हा कर्नाटकचा भाग : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

मुंबई : बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहीजे या सीमावासीयांच्या घोषणांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा वादग्रस्त भाग तूर्त केंद्रशासित करावा, अशी मागणी केली. याला मुंबई ही कर्नाटकचा भाग आहे, असे विधान करत मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली आहे.
 
उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
 
‘सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित म्हणून घोषित करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. “रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में” तसेच “बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” या सीमावासियांच्या घोषणांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्याहस्ते ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी केलेल्या वक्तव्याला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी मुंबई हाच कर्नाटकचा भाग असल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
 
मुंबई हा कर्नाटकचा भाग! : सावडी
 
त्यांच्या या वक्तव्यावरून दोन्ही राज्यांच्या राजकारणाचा पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. लक्ष्मण सावडी म्हणाले, “सीमाप्रश्न जरी सर्वोच्च न्यायालयात असला तरीही निर्णय आमच्याच बाजूने लागणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे. मुंबई ही पूर्वीपासूनच कर्नाटकचा भाग असल्याचे मानतो. मुंबईवर आमचाही हक्क आहे. मुंबई कर्नाटकात यायाला हवी. मुंबईचा कर्नाटकात सामावेश होत नाही तोपर्यंत मुंबई केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा.”, अशी अजब मागणी केली.
 
‘सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा’, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर हल्लाबोल करताना केली. त्याला सावडी यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला सावडी यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी मुंबईवर कर्नाटकचा हक्क सांगितला आहे.
 
अजित पवारांचेही प्रत्युत्तर
याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला काहीही तर्क नाही. कर्नाटकचा मुंबईशी संबंध येत नाही. तिथल्या जनतेला खुश करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. “राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकातील वादग्रस्त भाग केंद्रशासित करावा, अशी मागणी केली होती. .या मागणीचा आणि मुंबई केंद्रशासित करा या मागणीचा काही अर्था-अर्थी संबंध आहे का?, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.