नांदेड जिल्ह्यात 48 कोरोना बाधितांची भर ,एकाचा मृत्यू

नांदेड ,दि. 25 :-बुधवार 27 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 43 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 9 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 48 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 1 हजार 423 अहवालापैकी 1 हजार 319 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 378 एवढी झाली असून यातील 21 हजार 269 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 322 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.मंगळवार 26 जानेवारी 2021 रोजी विवेक नगर, नांदेड येथील 78 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 582 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 27, मुखेड कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, देगलूर कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 1 असे एकूण 43 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 19, अर्धापूर 1, हदगाव 7, मुदखेड 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 4, भोकर 1, किनवट 2, माहूर 3 असे एकुण 39 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, अर्धापूर 3, नांदेड ग्रामीण 1, उमरी 1 असे एकूण 9 बाधित आढळले.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 6 हजार 958एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 80 हजार 297एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 378एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 269एकुण मृत्यू संख्या-584उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.04 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-23आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-32आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-322आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-9.