नव्या रुग्णांची संख्या आणि दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूची संख्या सर्वात कमी असणाऱ्या देशांमध्ये भारताचे स्थान कायम

भारतात दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दैनंदिन बऱ्या होणाऱ्यांची संख्या जास्त

नवी दिल्ली, 27 जानेवारी 2021:

भारतात दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दैनंदिन बऱ्या होणाऱ्यांची संख्या जास्त राहण्याचा कल सुरूच आहे. गेल्या 20 दिवसापासून दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दैनंदिन बऱ्या होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

देशात बरे झालेल्यांची एकूण  संख्या 1,03,59,305 झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 13,320 रुग्ण बरे झाले.रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आता  96.91% झाला आहे.

गेल्या काही आठवड्यात सक्रीय रुग्ण संख्येत देशाचा आलेख अभूतपूर्व दैनंदिन बदल दाखवत आहे. गेल्या 24 तासात 12,689 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.भारतात एकूण  1,76,498 सक्रीय रुग्ण आहेत.सक्रीय रुग्ण,  एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 1.65% आहेत.गेले सात दिवस दहा लाख लोकसंख्येमध्ये दैनंदिन सर्वात कमी नवे रुग्ण असणाऱ्या  देशांमध्ये भारत (69) आहे.

केंद्र सरकारच्या तत्पर चाचण्या, शोध,उपचार,या धोरणाचा अवलंब यामुळे हा प्रोत्साहनदायी आलेख दिसत आहे. मोठ्या प्रमाणात आणि व्यापक चाचण्या, तत्पर देखरेख आणि संपर्कातल्या लोकांचा मागोवा, गृह विलगीकरणावर देखरेख, उच्च दर्जाचे औषधोपचार केंद्र सरकारकडून जारी  मार्गदर्शक सूचना यामुळे बरे होणाऱ्याची  संख्या वाढती राहिली.

केंद्र, राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांनी, रुग्णालयात प्रभावी उपचार, गृह विलगीकरणावर देखरेख, स्टिरोइडचा वापर, रुग्णांना वेळेवर आणि तत्पर उपचारासाठी रुग्णवाहिका सेवेत सुधारणा यावर लक्ष केंद्रित केले. व्हेंटीलेटर, पीपीई कीट, औषधे यांची पुरेशी संख्या सुनिश्चित करत केंद्र सरकारने, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना सहाय्य केले. आशा कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न आणि गृह विलगी करणातल्या रुग्णांसंदर्भात प्रभावी देखरेख सुनिश्चित केली. 

ई संजीवनी या डिजिटल मंचामुळे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध झाल्याने कोविड चा प्रसार रोखण्यात आणि त्याच बरोबर कोविड व्यतिरिक्त आणि अत्यावश्यक सेवा सुरु राखण्यासाठी मदत झाली. अति दक्षता विभागामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांची वैद्यकीय व्यवस्थापन  क्षमता वृद्धिंगत करण्यावरही  केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले. नवी दिल्लीतल्या एम्स मधून तज्ञांनी कोविड- 19 व्यवस्थापनाबाबत केलेले राष्ट्रीय ई आयसीयू या संदर्भात अतिशय उपयुक्त ठरले.

27 जानेवारी 2021 ला सकाळी 8  वाजेपर्यंत सुमारे 20 लाखाहून अधिक (20,29,480) लाभार्थींनी  देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियाना अंतर्गत लस घेतली.गेल्या 24 तासात 5,671 जणांनी 194 सत्रात, लस घेतली.आतापर्यंत 36,572  सत्रे झाली आहेत.

बरे झालेल्या पैकी 84.52% हे 9  राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले आहेत.केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 5,290 जण कोरोनामुक्त झाले महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 2,106 तर  कर्नाटकमध्ये 738 जण बरे झाले.

नव्या रुग्णांपैकी 84.73% रुग्ण  सात राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले आहेत.केरळमध्ये  दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 6,293 नवे  रुग्ण आढळले, महाराष्ट्रात 2,405 आणि कर्नाटकमध्ये 529  नव्या रुग्णांची नोंद झाली.गेल्या 24 तासातल्या     मृत्यूंपैकी  83.94% मृत्यू  7  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.महाराष्ट्रात  सर्वाधिक 47   मृत्यूंची नोंद झाली. केरळमध्ये 19   आणि छत्तीसगडमध्ये 14 मृत्यूंची नोंद झाली.गेले  सात दिवस  भारतात दहा लाख लोकसंख्येमध्ये एका मृत्यूची नोंद झाली.