औरंगाबाद जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होणार -पालकमंत्री सुभाष देसाई

Image
  • पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
  • कमांड अँड कंट्रोल केंद्रामुळे गुन्हेगारीला आळा बसणार
  • जिल्ह्याचा मानवविकास निर्देशांक सातत्याने वाढविणार
  • बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
  • पर्यटन जिल्हा म्हणून औरंगाबाद जिल्हा आघाडीवर राहणार
  • जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळणार

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका):  औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासासाठी शासन कटिबद्ध असून लवकरच औरंगाबाद जिल्हा कोरोनामुक्त होऊन्‍ शुन्य मृत्यूदर होईल. पर्यटन, कृषी, उद्योग, पाणीपुरवठा आदी विभागांच्या कालबद्ध योजनेतून जिल्ह्याचा सर्वांगीन विकास होईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जनतेला उद्देशून केलेल्या शुभेच्छा संदेशात केले.

Image

पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले, यावेळी श्री. देसाई बोलत होते. कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, इतर मान्यवर, अधिकारी यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री यांनी देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटालाही आपण खंबीरपणे सामोरे जात आहोत.  गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत संसर्गाला रोखण्याच्या दिशेने लसीकरणाची सुरुवात हे एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल आहे.

Displaying _DSC9283.JPG

आपल्या कोरोना योध्दयांना पहिल्या टप्प्यातील लसीकरण करणे सुरू झाले. पण आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा असल्याने सर्वांना लस मिळेपर्यंत कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  वाढत असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होऊन आपल्या सर्वांचे प्रयत्न यशस्वी होतील, याची खात्री आहे. तसेच जिल्ह्यातील मृत्यूदर कमीत कमी होत असून ही खरोखरदच दिलाासादायक बाब आहे, जिल्ह्याचा शुन्य मृत्यूदर व्हावा, ही प्रार्थना आहे.

Displaying _DSC9269.JPG

जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत औरंगाबाद शहरात रस्ते अपघातांची संख्या व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी करण्यात यश मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा झालेला गौरव अभिमानास्पद आहे.

 कोविडच्या काळात ‘लोकशाही न्यूज’ या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या CPL म्हणजेच ‘कोरोना प्रीमिअर लिग’ या स्पर्धेत शासकीय यंत्रणेने केलेले प्रयत्न, लोकसहभाग, मृत्यूदर कमी करण्यात यश आल्याने आपल्या औरंगाबादला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यानिमित्त देखील आपल्या जिल्ह्याचा शासनामार्फत गौरव होणार आहे. त्याबद्दल मनपा आणि जिल्हा प्रशासनाचा गौरव करतो.

कोरोना संकटाने जगाचा इतिहासच बदलवून टाकला. महाराष्ट्राने या कठीण काळात प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी वर्गाला, सर्व नागरिकांना सुरक्षीत ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत शेती, रोजगार यासह इतर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्याला प्राधान्य दिले.

          औरंगाबाद जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान (PMKISAN) योजने अंतर्गत एकुण 3 लाख 93 हजार  शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. औरंगाबाद जिल्हयात रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात गती घेत असून 9 तालुक्यांमध्ये 1307 शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे.  आता आपण कोष निर्मितीसाठीचे केंद्र करत आहोत.

Displaying _DSC9257.JPG

       शिवभोजन ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून सर्व तालुक्यामध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.  या योजनेला सुरूवात होऊन आज एक वर्ष पूर्ण होत असून आजपर्यंत 7 लाख 1 हजार 978 लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, याचा आनंद आहे.

          आरोग्‍य सुविधांच्या बळकटीकरणासोबतच जिल्ह्याचे अर्थचक्र ज्यावर आधारित आहे, असे उद्योग क्षेत्र सुरळीत ठेवण्यासाठी पहिल्या टप्‌प्याटप्याने परवानगी देण्यात आल्या. आता उद्योगचक्र फिरू लागले आहे, यात औषधी उत्पादन, खाद्यपुरवठा, खाद्य प्रक्रिया व इतर पूरक उद्योगांचा समावेश आहे.

           ऑरिक सिटी शेंद्रा येथे एका रशियन कंपनीस स्टिल उत्पादनासाठी 44 एकर जागेचे वाटप करण्यात आले आहे.  या कंपनीत 1 हजार कोटींची गुंतवणूक होऊन स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. DMIC शेंद्रा येथे सन 2020 मध्ये 62 एकरचे 20 भूखंड वाटप करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या तीनही सामंजस्य करारामध्ये जिल्ह्यातील नवीन येणाऱ्या उद्योगांचा समावेश आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक प्रकारचे कमांड अँड कंट्रोल केंद्र पोलिस आयुक्तालयात कार्यान्वित केले आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होईल व नागरिकांना दिलासा मिळेल.

Displaying _DSC9339.JPG

जिल्ह्याचा मानवविकास निर्देशांक सातत्याने वाढविण्याच्यादृष्टीने जिल्हा आघाडीवर नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शिवाय जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांना पुढाकार घेणे आवश्यक आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी जाणीवेने प्रयत्न करत आहेत. या जिल्ह्याला पर्यटनातील आघाडीवरचा जिल्हा म्हणून लौकिक प्राप्त होईल. तसेच जलजीवन मिशनच्या माध्यमातून 706 कोटी रुपये निधीतून प्रत्येक घराला नळाला पाणी मिळेल, अशा प्रकारच्या कालबद्ध योजनेसही शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा चौफेर प्रगती होऊन येथील नागरिकांना समाधानकारक व आनंदाचे जीवन लाभावे यासाठीचे शासनाचे प्रयत्न यशस्वी होतील, असे

   सुरूवातीला पालकमंत्री श्री. देसाई यांचे विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर श्री. देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर श्री. देसाई यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी श्री.देसाई यांच्याहस्ते विविध पुरस्कार, बक्षीसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर श्री. देसाई यांनी सर्व निमंत्रितांची भेट घेऊन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.

Displaying _DSC9296.JPG

पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण समारंभानंतर बक्षीस वितरण

अ.क्र.कार्यालयाचे नावनाव व पदकार्याचे स्वरूप
1जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, औरंगाबाद1.श्री. सुनिल केंद्रेकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद2.श्री. सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद3.श्रीमती एस.फिरासत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीऔरंगाबाद जिल्ह्यास सशस्त्रसेना ध्वजदिन निधी संकलन सन 2019-20 करिता शासनाकडून रूपये 92 लक्ष 67 हजार इतके उदि्द्ष्ट प्राप्त झाले होते. सदर उद्दिष्टपूर्ती  करीता विभागीय आयुक्त औरंगाबाद व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये विशेष मोहिम राबवून जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने 100 टक्के पेक्षा जास्त म्हणजेच 107 टक्के निधी संकलित करून रूपये रूपये एक कोटी दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही जास्त रक्कम जमा केली. यासाठी सैनिक कल्याण विभाग पुणे, महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा ध्वजदिन निधी संकलन समिती,  औरंगाबाद व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांना पालकमंत्री यांच्याहस्ते स्मृती चिन्ह प्रदान करून सन्मानित केले.
02आदिवासी विकास विभागश्री. मिलिंद देसाई, पोलीस निरिक्षक.पोलीस दक्षता पथकामध्ये पोलीस निरिक्षक या पदावर कार्यरत असलेले श्री. मिलिंद देसाई यांना उल्लेखनीय सेवोसाठी महामहीम राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेले आहे.
03राज्य गुप्त वार्ता विभाग, औरंगाबादश्री.जयराम बाजीराव धनवई, गुप्तवार्ता अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, औरंगाबादराज्य गुप्तवार्ता विभाग औरंगाबाद येथे श्री. धनवई, गुप्तवार्ता अधिकारी यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती  पोलीस पदक देण्यात आले.  
04पोलीस आयुक्त कार्यालय , औरंगाबादकेंद्रीय गृहमंत्री पदकाचे स्क्रोल1.श्री. अविनाश आघाव, पोलीस निरिक्षक2.श्रद्धा अशोक वायदंडे, सहा. पोलीस निरिक्षकआंतरिक सुरक्षा सेवापदक1.श्री. संतोष अशोक पाटील, पोलीस निरिक्षक2.श्री. अमोल माणिकराव देवकर, पोलीस निरिक्षक3.श्री. अनिल भानुदास मगरे, पोलीस उपनिरिक्षकसर्व उत्कृष्ट अपराधसिद्धी प्रशस्तीपत्र1.श्री. मनिष कल्याणकर, पोलीस निरिक्षक2.श्री. अविनाश आघाव, पोलीस निरिक्षक3.श्री. राहुल खटावकर, सहा. पोलीस निरिक्षक4.श्री. सुनिल आर. बडगुजर पोह/238 पोलीस आयुक्तालय , औरंगाबाद शहर अस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, आंतरिक सुरक्षा सेवा पदक व सर्व उत्कृष्ट अपराधसिद्धीचे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह-2019 प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची यादी
अ.क्र.पोमसं यादी अ.क्र.हुदापोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे नाव
0114पोलीस उपआयुक्तडॉ. राहुल धर्मराज खाडे
0228पोलीस निरिक्षकश्री. सुरेंद्र गजेंद्र मळाळे
0368पोलीस निरिक्षकश्री. कैलास मुन्नालाल प्रजापती
0481पोलीस निरिक्षकश्री. किरण जितेंद्रसिंग पाटील
0594सहाय्यक पोलीस निरिक्षकश्री. अजबसिंग हिरालाल जारवाल
06114सहाय्यक पोलीस निरिक्षकश्री. घनश्याम बाबासाहेब सोनवणे
07162पोलीस उपनिरिक्षकश्री. विनोद जगन्नाथ काळे
08187सफौश्री. दीपक नानासाहेब ढोणे
09261सफौश्री. मोहनसिंग गंगासिंग राणा
10441पोह/756श्री. देविदास भिमचंद गायके
11507पोह/507श्री. ज्ञानेश्वर सांडु भाकरे
12691पोहो/1401श्री. खान इरफान उस्मान खान
13664पोना/1707श्री. इम्तियाज अहेमद महेमुद अहेमद
14672पोना/1185श्री. कैलास साहेबराव दाबके
15696पोना/1574श्री. बाळु बळीराम चव्हाण
16709पोना/1528श्री. इलास भिकाजी वाघ
17796पोशि/1924श्री. पोपट शेकनाथ अळंजकर
18797मपोशि/1699श्री. मंजुळा कडुबा नागरे

     पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी) फेब्रुवारी-2020 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

अ.क्र.U-Dise No.शाळेचे नावसिट नंबरविद्यार्थ्यांचे नावमार्क टक्केवारीगुणतत्ता प्रकार
012719007028पोद्यार इंटरनॅशनल स्कुल (ICSE) गारखेडा औरंगाबादM5514128156श्लोक संदेश बाहेती88.7324CBSE/ICSE
0227190100410टेंडर केअर होम औरंगाबादM5510107183यशराज महावीर गादिया85.9155CBSE/ICSE
0327191109811नाथव्हॅली स्कूल, औरंगाबादM5514107124आर्या रत्नाकर चव्हाण83.0986CBSE/ICSE

पूर्व माध्यमिक इयत्ता 8 वी

0127190317305महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूल पिशोरH5514107124प्रज्वल संजय पाटील89.1156ग्रामीण
0227190115203ज्ञानदा इंग्लिश स्कूल पोखरीH5510157168सार्थक नानासाहेब झोहल84.6667CBSE/ICSE
0327191108614पोद्दार इंटर नॅशनल स्कूल (CBSE) सुतगिरणी रोड, औरंगाबादH5514151314व्यंकटेश लक्ष्मण थोटे82.6667CBSE/ICSE

सहायक आयुक्त, समाज कल्याण, औरंगाबाद

03 जानेवारी 2021 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धांचे निवड झालेल्या बक्षीसपात्र विद्यार्थी

अ.क्र.स्पर्धकाचे नावस्पर्धेव्दारे निवड क्र.शिक्षण घेत असलेले वर्गशिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाचे नाव
1शेख तहाअनमप्रथमडीएड व्दितीय वर्षशासकीय अध्यापक विद्यालय, पैठण
2सोनम आनंद जाधवव्दितीयबी.एस्सी व्दितीय वर्षश्री आसारामजी भांडवलदार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, देवगाव रंगारी
3दिनेश रामहरी घोडकेतृतीयबी.सी.ए.तृतीय वर्षछत्रपती शाहु कलावाणिज्य, विज्ञान महाविद्यालय लासूर स्टेशन

जिल्हा उद्योग केंद्र, औरंगाबाद

जिल्हा उद्योग केंद्र, औरंगाबाद मार्फत जिल्हा लघु उद्योग पुरस्कार सन 2018-2019

सन 2018

1श्री. दुष्यंत लक्ष्मणराव आठवले-मे. वैशाली लेझरप्रथम पुरस्कार
2श्री. हेमंत दिगंबर विबरंगल मे. एअरटेक इंजिनिअर्सव्दितीय पुरस्कार

सन 2019

1श्री. अभय गिरीश हंचनाळ-मे. मायक्रोनिक्स गेजेस प्रा. लि.प्रथम पुरस्कार
2श्री. तुकाराम किसनराव पोतले- मे. कृपा टेक्नोलाजिस, औरंगाबादव्दितीय पुरस्कार

महसाष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, औरंगाबाद – पाच लाभार्थ्यांना सौर पंपाचे वाटप

अ.क्र.नावगावाचे नावतालुका 
01श्री. विजय लक्ष्मण इंगळेअमसारीसिल्लोडशासनातर्फे दिनांक 26.01.2021 रोजी महाकृषी ऊर्जा अभियान जाहीर करण्यात आले या अभियाना अंतर्गत 5 शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप
02श्री. कान्हु मारोती गल्हाटेबालानगरपैठण
03श्री. पांडुरंग धोंडू पवारबाबराफुलंब्री
04श्री. सिताराम पांडू अल्हाटअकोलीगंगापूर
05