शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

औरंगाबाद, दि. 25- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबादतर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 या आजाराबाबत लोककलांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज करण्यात आला.

May be an image of 1 person, standing and road

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल  गुप्ता, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह विविध विभागांचे व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विद्यमान सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने गेल्या वर्षभरात या सरकारने घेतलेले लोककल्याणकारी निर्णय त्याचबरोबर ‘कसम आणि कोविड-19 आजाराबाबत’ कोरोना काळात शासनाने केलेल्या कामांबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अतंर्गत जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद यांच्यावतीने लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

          लोककला आणि पथनाट्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनेतेपर्यंत पोहचवण्याचे प्रभावी माध्यम असून याचा नागरीकांना लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी केले. 

          लोककला आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्या-या औरंगाबाद जिल्ह्यातील 15 संस्थांचा शासनाच्या यादीत समावेश आहे. या संस्थांमार्फत जिल्ह्यातील 9 तालुक्यातील बाजारपेठेच्या व मोठ्या 180 गावांमध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे