केवळ 6 दिवसांत भारतात 1 दशलक्ष लसीचे डोस

भारतातील सक्रीय रुग्णांची 1.84 लाखांपेक्षा आणखी कमी
16 लाख आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे लसीकरण

मुंबई, दि. २४ :यशस्वी टेस्ट- ट्रॅक- ट्रीट-टेस्ट-टेक्नॉलॉजी या रणनीतीचा पुरावा म्हणून भारतातील दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येने सातत्याने घट नोंदवली असून परीणामी सक्रीय रूग्णांच्या संख्या ही कमी झाली आहे.

May be an image of 1 person and standing

आज भारतात सक्रिय रुग्णसंख्या 1,84,408 इतकी आहे. एकूण पाॅझिटीव्ह रुग्ण आणि सक्रीय रूग्ण यांचा हिस्सा घटला असून तो 1.73% इतका खाली आला आहे.गेल्या 24 तासांत 15,948 रूग्ण बरे झाले असून गेल्या 24 तासांत सक्रीय रूग्णसंख्येत एकूण 1,254 ने घट झाली आहे.

केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक,उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा सक्रीय रूग्णसंख्येत 75% वाटा आहे.24 जानेवारी 2021 रोजी 8 वाजेपर्यंत जवळजवळ 16 लाख (15,82,201) लाभार्थ्यांना कोविड-19ची लस देण्यात आली.गेल्या 24 तासांत 3,512 सत्रांत जवळपास 2 लाख लोकांना लस देण्यात आली असून (1,91,609)लसींची 27,920 सत्रे घेण्यात आली आहेत.महाराष्ट्रात 99,885 लोकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे.

लसीच्या 1 दशलक्ष डोसांचे वाटप करण्यास भारताला केवळ 6 दिवस लागले.ही गती यूएसए आणि यूके या देशांपेक्षा अधिक आहे.1 दशलक्ष डोसांचा टप्पा गाठायला यूकेला  18 दिवस तर यूएसएला 10 दिवस लागले.गेल्या 24 तासांत 14,849 नव्या रुग्णांची नोंद झाली असून महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2697 रूग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात 56 मृत्यु झाले असून त्याखालोखाल केरळमध्ये आणि दिल्लीत अनुक्रमे 23 आणि 10 मृत्यु झाले आहेत.