32 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 प्रदान

पंतप्रधान २५जानेवारीला  या पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद

32 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 प्रदान करण्यात आले आहेत. भारत सरकार नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार प्रदान करते.

या पुरस्कारार्थी बालकांत 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 32 जिल्ह्यांतील मुलांचा समावेश  आहे. 7 पुरस्कार कला आणि संस्कृती क्षेत्रातील बालकांना, 9 पुरस्कार नवनिर्मिती क्षेत्रातील बालकांना, 5 बालकांना शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल पुरस्कार देण्यात आले आहेत. 7 बालकांना क्रीडा क्षेत्रात,3 बालकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून एका बालकाला त्याच्या समाज सेवेच्या क्षेत्रातील प्रयत्नांसाठी सन्मानित करण्यात आले आहे.

या यश संपादन करणाऱ्या तरुण (लहान)मुलांचे कौतुक करताना भारताच्या सन्माननीय राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे “मला आशा आहे की प्रधानमंत्री बाल पुरस्कार -2021 केवळ विजेत्यांनाच प्रेरणा देईल असे नव्हे तर इतर कोट्यवधी मुलांना स्वप्ने पहायला आकांक्षांनी प्रेरित व्हायला, तसेच आपल्या मर्यादा वाढवायला प्रेरणा देतील.  आपण सर्व जण आपल्यातील सर्वोत्तमाने देशाला यशाच्या नव्या  शिखरावर आणि समृध्दीकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू या.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या सर्व पुरस्कारार्थी बालकांशी व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.

पीएमआरबीपी पुरस्कारार्थींची यादी खालीलप्रमाणे:

S. No.NameStateCategory
1Ameya LaguduAndhra PradeshArt and Culture
2Vyom AhujaUttar PradeshArt and Culture
3Hrudaya R KrishnanKeralaArt and Culture
4Anurag RamolaUttarakhandArt and Culture
5Tanuj SamaddarAssamArt and Culture
6Venish KeishamManipurArt and Culture
7Souhardya DeWest BengalArt and Culture
8Jyoti KumariBiharBravery
9Kunwar Divyansh SinghUttar PradeshBravery
10Kameshwar Jagannath WaghmareMaharashtraBravery
11Rakeshkrishna KKarnatakaInnovation
12Shreenabh Moujesh AgrawalMaharashtraInnovation
13Veer KashyapKarnatakaInnovation
14Namya JoshiPunjabInnovation
15Archit Rahul PatilMaharashtraInnovation
16Ayush RanjanSikkimInnovation
17Hemesh ChadalavadaTelanganaInnovation
18Chirag BhansaliUttar PradeshInnovation
19Harmanjot SinghJammu AndKashmirInnovation
20Mohd ShadabUttar PradeshScholastic
21AnandRajasthanScholastic
22Anvesh Subham PradhanOdishaScholastic
23Anuj JainMadhya PradeshScholastic
24Sonit SisolekarMaharashtraScholastic
25Prasiddhi SinghTamil NaduSocial Service
26Savita KumariJharkhandSports
27Arshiya DasTripuraSports
28Palak SharmaMadhya PradeshSports
29Mohammad RafeyUttar PradeshSports
30Kaamya KarthikeyanMaharashtraSports
31Khushi Chirag PatelGujaratSports
32Mantra Jitendra HarkhaniGujaratSports