औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित ९३ रुग्णांचा मृत्यू  

जिल्ह्यात 615 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि.05 : औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1834 झाली आहे. यापैकी 1126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 93 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 615 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. समता नगर (1), भोईवाडा (1), मिल कॉर्नर (1), चिकलठाणा (1), रेहमानिया कॉलनी (1) किल्लेअर्क (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये पाच महिला आणि एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

आज सकाळी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भारतमाता नगर (1), इंदिरानगर न्यू बायजीपुरा (1), न्यू कॉलनी, रोशन गेट (1), भावसिंगपुरा (1)‍, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (1), बेगमपुरा (1), चिश्तिया कॉलनी (1), फाझलपुरा (1), रेहमानिया कॉलनी (1), गांधी नगर (1), युनूस कॉलनी (2), जुना मोंढा, भवानी नगर (1), शुभश्री कॉलनी, एन सहा (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन 9 (1), आयोध्या नगर, एन सात (7), बुडीलेन (3), मयूर नगर, एन अकरा (1),विजय नगर, गारखेडा (3), सईदा कॉलनी (1), गणेश कॉलनी (1), एसटी कॉलनी, फाजलपुरा (1), रोशन गेट परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), औरंगपुरा (2), एन आठ सिडको (1), समता नगर (4), ‍मिल कॉर्नर (2), जवाहर कॉलनी (3), मोगलपुरा (2), जुना मोंढा (1), नॅशनल कॉलनी (1), राम मंदिर, बारी कॉलनी (1), विद्यानिकेतन कॉलनी (1), देवडी बाजार (1), एन सात सिडको (1), एन बारा (1), आझाद चौक (1), टी.व्ही. सेंटर एन अकरा (1), कैलास नगर (1), अनय्‍ (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 19 महिला आणि 40 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

घाटी रूग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या 30 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा चार जून रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या या 30 वर्षीय गरोदर महिलेस 28 मे रोजी घाटीमध्ये दुपारी चार वाजता भरती करण्यात आले होते व त्याच दिवशी रुग्णाची प्रसूती झाली व त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यांचा अहवाल 29 मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या किडनीचे कार्य अतिशय कमी असल्याने त्यांना डायलिसिस देण्यात आले. परंतू त्यांच्या शरीरातील प्राण वायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार चालू असताना 4 जून रोजी दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 72, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 20, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 93 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *