नांदेड जिल्ह्यात 15 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 22 :- शुक्रवार 22 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 15 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 7 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 8 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 24 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 1 हजार 453 अहवालापैकी 1 हजार 421 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 199 एवढी झाली असून यातील 21 हजार 99 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 315 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. गुरुवार 21 जानेवारी रोजी लोहा तालुक्यातील भानेगाव येथील 67 वर्षाच्या एका पुरुषाचा तर मुखेड शिवाजीनगर येथील 51 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 582 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 8, माहूर तालुक्यांतर्गत 2, बिलोली तालुक्यांतर्गत 2, मुखेड कोविड रुग्णालय 2, किनवट कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 4 असे एकूण 24 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 7 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, भोकर 1, यवतमाळ 1, मुखेड 1, कंधार 1 असे एकुण 8 बाधित आढळले. जिल्ह्यात 315 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 20, मुखेड कोविड रुग्णालय 14, महसूल कोविड केअर सेंटर 11, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 7, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 160, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 42, खाजगी रुग्णालय 27 आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 99 हजार 569एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 73 हजार 158एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 199एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 99एकुण मृत्यू संख्या-582उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5 आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-315आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-9.