गुरू गोविंद सिंह यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन देश आगेकूच करत आहे : पंतप्रधान

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2021

गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे. पंतप्रधानांनी याप्रसंगी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण या अंतर्गत 6 लाख लाभार्थ्यांना दूरदृष्य प्रणालीद्वारे आर्थिक मदत जारी करताना ते आज बोलत होते.

पंतप्रधानांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आणि प्रकाश पर्वानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. गुरु गोविंद सिंह यांची आपल्यावर कृपा राहिली आणि त्यांनी आपल्याला सेवा करण्यासाठी मोठी संधी दिली, अशा भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केल्या. गुरु गोविंद सिंह यांचे जीवन आणि त्यांनी दिलेला संदेश आपल्याला सेवा आणि सत्याच्या मार्गावरून जात असताना येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रेरणा देतात. सेवा आणि सत्य या भावनेतून हे सामर्थ्य आणि धैर्य निर्माण होते आणि गुरु गोविंद सिंह यांनी दाखविलेल्या याच मार्गावरून देश पुढे वाटचाल करत आहे, असे मोदी म्हणाले.

 प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधानांचे नमन

गुरु गोविंदसिंग जी यांच्या प्रकाश पर्वाच्या पावन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना नमन केले. 

Image

“गुरु गोविंदसिंग जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त मी त्यांना वंदन करतो. न्यायप्रिय आणि सर्वसमावेशक समाज घडविण्यासाठी त्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले. त्यांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहताना ते कधी विचलित झाले नाहीत. 
त्यांचे धैर्य आणि त्यागसुद्धा आपल्या स्मरणात आहे. 

Image

आमच्या सरकारच्या कार्यकाळात गुरू गोविंदसिंग जी यांचे 350 वे प्रकाश पर्व आल्याने गुरू साहिबांची माझ्यावर विशेष कृपा आहे. मला पाटण्यातील भव्य उत्सव आठवतो, जिथे मला जाण्याची आणि माझा आदरभाव व्यक्त करण्याची संधी देखील मिळाली होती.” अशा शब्दात पंतप्रधानांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.