ब्लू वॉटर ऑपरेशन्सला भारतीय नौदलाकडून पर्यावरण पूरक वसा

पर्यावरण संरक्षण आणि हरित उपक्रमाला नेहमीच भारतीय नौदलाचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. एक जबाबदार बहुआयामी शक्ती असलेल्या भारतीय नौदलाने ऊर्जा संवर्धन, सागरी प्रदूषणात कपात, आणि उर्जेच्या पर्यायी स्त्रोतांचा वापर करून पर्यावरणावरील प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ब्लू वॉटर’ परिचालनाला पर्यावरणस्नेही बनवण्याचे भारतीय नौदलाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘इंडियन नेव्ही एन्व्हायर्नमेन्ट कन्झर्वेशन रोडमॅप’ (आयएनईसीआर) एक मार्गदर्शक आणि सक्षम दस्तऐवज आहे.

सागरी प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि शाश्वत वापर यासारख्या पर्यावरणीय मुद्द्यांवर जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन हा जागतिक व्यासपीठ बनला आहे. भारतीय नौदलाने लॉकडाऊन संबंधी लागू नियमांचे पालन करत यावर्षी जागतिक पर्यावरण दिन आयोजित केला. नियमित बाह्य उपक्रमांऐवजी नौदल तळांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे  शैक्षणिक जागरूकता कार्यक्रम, व्याख्याने आणि वेबिनार आयोजित केले गेले.

इंजिनमधून बाहेर पडणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाने इंधन वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आयओसीएलशी सहकार्य केले आहे. नवीन वैशिष्ट्ये आंतरराष्ट्रीय निकषांना मागे टाकून त्यामध्ये कमी सल्फर सामग्री समाविष्ट केली आहे जी दीर्घकालीन दृष्टया उत्सर्जन पातळी  तसेच जहाजाची देखभाल आवश्यकता देखील कमी करेल. जैवविविधतेचे महत्त्व ओळखून, जी योगायोगाने यंदाच्या जागतिक पर्यावरण दिन -2020 ची संकल्पना आहे, समुद्री पर्यावरणाच्या रक्षणासाठी नौदलात पुरेसा भर दिला जात आहे. भारतीय नौदलाने जहाजांमधील प्रदूषण प्रतिबंध संबंधी  आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या  (एमआरपीओएल)नियमनासाठी  सर्व सहा वेळापत्रकांची स्वेच्छेने अंमलबजावणी केली. जहाजांवर तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नौदलाच्या सर्व  जहाजांमध्ये तैलीय पाण्याचे विभाजक (ओडब्ल्यूएस) आणि कचरा प्रक्रिया उपकरणे (एसटीपी) सारख्या  प्रदूषण नियंत्रण उपकरणे बसवण्यात आली आहेत. तसेच  हार्बर वॉटरची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी, नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (एनएमआरएल), मुंबई च्या माध्यमातून वेगवान बायोमेडिएशन तंत्रज्ञान देखील विकसित केले आहे.

कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नात, ई-सायकल, ई-ट्रॉली आणि ई-स्कूटर सारख्या ई-वाहनांच्या वापरात वाढ होण्यासाठी उपाययोजना लागू केल्या आहेत. दीर्घकालीन रणनीती म्हणून ई-वाहने किंवा दुचाकींच्या माध्यमातून कामकाजाच्या वेळी जीवाश्म-इंधन आधारित वाहनांचा वापर हळूहळू कमी करण्याचे नियोजन केले जात आहे. त्याचा प्रचार करण्यासाठी, काही तळांवर नियमितपणे ‘नो व्हेईकल डे’ पाळला जातो आणि काही नौदल संस्थांमध्ये ‘वाहन मुक्त तळ’ ही संकल्पनादेखील सुरू केली जात आहे.

नौदलामध्ये केंद्रस्थानी असणारे क्षेत्र म्हणजे ऊर्जा कार्यक्षम उपकरणाच्या प्रगतीशील प्रेरणेतून एकूण वीज वापर कमी करणे हे आहे. भरीव प्रयत्नांमुळे पारंपारिक प्रकाशयोजनेपासून  अधिक ऊर्जा कार्यक्षम प्रकाशाकडे परिवर्तन झाले आहे. भारतीय नौदल आस्थापनांमध्ये एकत्रित केलेल्या इतर महत्त्वपूर्ण ऊर्जा बचत उपायांमध्ये उच्च उर्जा घटक राखण्यासाठी कॅपेसिटर बँकांचा वापर, नैसर्गिक प्रकाशासाठी पारदर्शक ऍक्रेलिक शीटच्या छतांचा वापर, प्रभावी देखरेखीसाठी एससीएडीए (सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा अधिग्रहण) आधारित वीज मीटर , ऑक्युपन्सी सेन्सर, स्काय पाईप्स आणि कार्यशाळेच्या मजल्यावर टर्बो-व्हेंटिलेटर यांचा समावेश आहे.

उदयोन्मुख कल आणि केंद्र सरकारच्या धोरणाच्या अनुषंगाने नवीकरणीय उर्जेचा वाटा वाढविण्यासाठी नौदलामध्येही प्रयत्न केले गेले आहेत. 24 मेगावॅट क्षमतेचे सौर फोटो व्होल्टाइक प्रकल्प नौदलाच्या किनाऱ्यावरील आस्थापनांमध्ये अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. याव्यतिरिक्त, स्वतंत्रपणे सौर उर्जेवर चालणारी उपकरणे देखील स्थापित केली आहेत ज्यांनी पारंपारिक उपकरणांची जागा घेतली आहे.

सर्व नौदल युनिट्सनी संकलन, विभाजन आणि त्यानंतरच्या केंद्र  सरकारच्या हरित निकषांनुसार हाताळण्यासाठी  कचरा हाताळण्याची आक्रमक प्रक्रिया स्वीकारली आहे. कारवार येथे नौदल तळावर एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन सुविधा (आयएसडब्ल्यूएमएफ) स्थापित केली जात आहे, ज्यात ओला कचर्‍यासाठी सेंद्रिय कचरा कन्व्हर्टर (ओडब्ल्यूसी) आणि कोरडे / विभागणी न केलेल्या  कचरा हाताळण्यासाठी सुविधा समाविष्ट आहे. वनीकरण आणि वृक्षारोपण मोहिमेद्वारे नौदलाचे हरित उपक्रम देखील वाढविले गेले आहेत. गेल्या एका वर्षात, अंदाजे 330 टन कार्बन डाय ऑक्साईड कमी करण्यासाठी 16,500 हून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली.

या उपक्रमांच्या अंमलबजावणीत समाजाच्या सहभागाने मोठी भूमिका बजावली आहे. वातावरणातील उपाय आणि उर्जा संवर्धनाच्या  आवश्यकतेबाबत जागरूक नौदल समुदायाद्वारे नौदलातील हरित उपाययोजना यशस्वी करणे शक्य झाले आहे. पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी मास ‘श्रमदान’, सागरी किनारपट्टीवरील स्वच्छता  अभियान इत्यादी विविध कार्यक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. याव्यतिरिक्त, वर्षात सर्वोत्कृष्ट हरित पद्धतींचा अवलंब करणाऱ्या युनिटला चषक देण्याच्या घोषणेमुळे ग्रीन उपक्रम स्वीकारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ती उपयुक्त ठरली आहे.

एकूणच, भारतीय नौदलाने परिचालन आणि धोरणात्मक भूमिकांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरण संवर्धन एकत्रित  करताना शाश्वत भविष्याकडे  लक्ष केंद्रित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *