औरंगाबादच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत-आदित्य ठाकरे

Image may contain: 5 people
छत्रपती संभाजी राजे मार्केट व क्रीडा संकुलाचे लोकार्पण
क्रांती चौक येथील सायकल ट्रॅकचे उद्घाटन

औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबाद शहराच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येऊन निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली.

Image may contain: 10 people, people standing

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी राजे मार्केट व क्रीडा संकुलाचे लोकार्पण श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते.  उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय आदींची उपस्थिती होती.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, शहरातील कचरा प्रकल्प, रस्ते विकास, सायकल ट्रॅक आदी विकासात्मक बाबींचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. शहराच्या विकासात भर घालणारी ही विकास कामे असून यापुढेही शहराच्या विकासाला प्राधान्य राहील. कल्याण-डोंबिवली, नाशिक-नागपूर प्रमाणे या शहराचाही रोड मॅप तयार करण्यात यावा, अशा सूचना श्री. ठाकरे यांनी मनपा आयुक्त श्री. पाण्डेय यांना दिल्या. त्याचबरोबर शहरातील नागरिकांनी कचरा विलगीकरण करून द्यावा. जेणेकरून शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास हातभार लागेल. स्वच्छ व सुंदर, सुरक्षित औरंगाबादसाठी शासन कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

सुरूवातीला श्री. ठाकरे यांनी स्टेडीयमची पाहणी केली. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण केले. तसेच स्टेडीयम, व्यापारी संकुलाचे फित कापून उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त श्री. पाण्डेय यांनी केले. सुत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते क्रांती चौक येथील सायकल ट्रॅकचे उद्घाटन

Image may contain: one or more people, people standing and outdoor

मनपा व स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या क्रांती चौक ते गोपाळ टी चौकापर्यंत तयार झालेल्या सायकल ट्रॅकचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. ठाकरे यांनी एकनाथ रंग मंदिर रस्त्याचा दर्जा व कामाची पाहणी करत रस्ता नियोजित वेळेत पुर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मनपा आयुक्त आणि प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉ. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह सायकल संघटनेचे अध्यक्ष व आयर्नमॅन असलेले नितिन घोरपडे व सायकलपटु यांची उपस्थिती होती.यावेळी श्री. ठाकरे, श्री. देसाई, श्री. जलील, श्री. पांडेय यांनी सायकल पटूंसह सायकल ट्रॅकरवर सायकल चालविण्याचा आनंद घेतला. यावेळी श्री. घोरपडे यांनी सायकल ट्रॅक बनविल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. तसेच सायकल ट्रॅक हा पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असून जास्तीत-जास्त नागरिकांनी सायकल चालविण्यासाठी या ट्रॅकचा वापर करावा असे आवाहनही केले.

औरंगाबाद शहर आता सी.सी.टि.व्ही.च्या निगराणीखाली
Image may contain: 2 people, people standing

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयातील Command Control केंद्राचे उद्घाटन पार पडले. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात सातशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने शहरातील गुन्हेगारीवर तसेच इतर घटनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. हे सर्व कॅमेरे अद्ययावत यंत्रणेने सुसज्ज असे आहेत आणि ते स्वयंचलित आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण शहराचे नियंत्रण करण्यात येणार असल्याने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या केंद्राचे कौतुक देखील केले.

Image may contain: one or more people, screen and indoor

यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मनपा आयुक्त आणि प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉ. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदी उपस्थित होते.