धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार ? ; पवारांचे सूचक वक्तव्य

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले बडे प्रस्थ धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर संक्रात ओढावली. 

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार केल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आज शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यासंदर्भात बैठक घेतली यानंतर मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत व नवाब मलिक यांच्यावर वैयक्तिक आरोप नाहीत असं म्हणत पक्षात चर्चा करून मुंडेंवर कारवाई करणार असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या बद्दल झालेल्या आरोपांवर बोलताना म्हटले की , मलिक हे राज्याचे एक महत्वाचा मंत्री आहेत. त्यांच्यावर कोणतेही वयक्तिक आरोप नाहीत.जे आरोप आहेत ते नातेवाईक यांच्यावर आहेत. यंत्रणा त्याची चौकशी करत आहे.आमचं त्याला पूर्ण सहकार्य असेल असे पवार यांनी म्हटले आहे.

यानंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात झालेल्या आरोपावर बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणाले की,धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप होत आहेत ते गंभीर आहेत. धनंजय मुंडे मला स्वतः भेटले व यावर त्यांनी मला सर्व माहिती दिली.त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार आलेली आहे. पोलीस याबद्दल चौकशी करतीलच . याविरोधात अगोदरच हायकोर्ट मध्ये देखील मुंडे गेले आहेत.आम्ही आमच्या पक्षात याबाबत चर्चा करणार आणि यावर निर्णय घेणार आहोत असे शरद पवार यांनी मुंडेंवर कारवाईचे अस्पष्ट संकेत दिले आहेत.

धनंजय मुंडेवर थेट बलात्काराचे आरोप केलेत. इतकंच नाही तर स्वत: धनजंय मुंडे यांनी लग्नाच्या बायकोशिवाय आपले आणखी एका महिलेसोबत संबंध होते आणि तिच्यापासून आपल्याला दोन मुलं असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. पण त्याच महिलेच्या धाकट्या बहिणीने आता बलात्काराचा आरोप केल्याने धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्दच पणाला लागली आहे. त्यात काही वेळापूर्वी नवा ट्विस्ट (New twist) आला आहे. 

भाजप नेत्याचा रेणू शर्मावर गंभीर आरोप  

भाजप नेते कृष्णा हेगडेंनी तक्रारदार रेणू शर्मावरच हनीट्रॅपचे (Honey Trap case) आरोप केलेत. त्यामळं हे प्रकरण अजून किती वळणं घेतंय हे बघावं लागेल. कोणत्याही सिनेमापेक्षा हा ड्रामा रंगत चाललाय. पण मुळात मुंडेंच्या घरात किंबहुना एक चांगलं घराणं समजल्या जाणाऱ्या मुंडेंच्या घरात असं का घडले आणि राजकारण या अशा गोष्टींमुळे बदनाम होण्यामागे जबाबदार कोण, याचीच चर्चा सुरु आहे.

मुंडे यांनी काय केला खुलासा? 

यात त्यांनी ‘माझ्याकडे रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे SMS रुपी पुरावे आहेत असा दावा केला. तसेच स्वत: धनजंय मुंडे यांनी लग्नाच्या बायकोशिवाय आपले आणखी एका महिलेसोबत संबंध होते आणि तिच्यापासून आपल्याला दोन मुलं असल्याचंही त्यांनी जाहीर केले.

दुसरा गौप्यस्फोट मनसे पदाधिकाऱ्यानं केला. मनसेच्या मनीष धुरी यांनीही रेणू शर्मा अनेकांना फसवत असल्याचा दावा केला. त्यापाठोपाठ रिझवान कुरेशी नावाच्या एका जेट कर्मचाऱ्यानंही रेणू शर्मा ही हनी ट्रॅप रचून, ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप केला.