औरंगाबाद जिल्ह्यात 40 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,दोन मृत्यू

जिल्ह्यात 44570 कोरोनामुक्त, 415 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 09 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 86 जणांना (मनपा 77, ग्रामीण 09) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44570 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 40 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46199 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1214 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 415 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (36)कौशल नगर (1), एन सहा शिवज्योती कॉलनी (1), मयूरबन कॉलनी (1), बजरंग नगर , चिकलठाणा (1), एन दोन सिडको (1), जय भवानी नगर (1), एन सहा अविष्कार कॉलनी (1), किराडपुरा (1), एन पाच पारिजात नगर (1), मयूर पार्क (1), कांचनवाडी (1), समर्थ नगर (4), आदर्श कॉलनी (1), एमजीएम परिसर (1), मंगल मेडिसेंटरजवळ, श्रेय नगर (3), राधाकृष्ण रेसिडन्सी, मिटमिटा (1), दिल्ली गेट (1), बन्सीलाल नगर (1), जय नगर, उस्मानपुरा (1), एन नऊ शिवाजी नगर (2), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (2), ज्योती नगर (2), साकेत नगर (1), बेगमपुरा (1), गजानन चौक, एन सहा (1), पीएसबीए इंग्लीश स्कूल (1), अन्य (2)

ग्रामीण (4)पैठण (1), सिल्लोड (1), अन्य (2)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत खुलताबाद तालुक्यातील 67 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयातील जवाहर कॉलनीतील 63 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.