जालना जिल्ह्यात 21 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 8 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 29 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आलाआहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –7, मानेगाव -1, मोतीगव्हाण -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -4, घनसावंगी तालुक्यातील बोर राजणी -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर-1, बदनापुर तालुक्यातील आनवी -1, बाजार वाहेगाव -1, नुर रुग्णालय -1, राजेवाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1 आरटीपीसीआरद्वारे 21 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 21 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19477 असुन सध्या रुग्णालयात- 114 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6754 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-332 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-103355 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-21 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13324 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-89562 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 142, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-6333

14 दिवस पाठपुरावादैनिक केलेल्या व्यक्ती- 15 , 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6355 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-114,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -01, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-29, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12771,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-200 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-353