बायोगॅस योजनेच्या लाभधारक महिलेशी विभागीय आयुक्तांनी भेट देवून साधला संवाद

Image may contain: 1 person, standing, outdoor and nature

नांदेड (जिमाका) दि. 7 :- अपारंपारिक ऊर्जा व कृषि विभागांतर्गत हाती घेतलेल्या विविध योजनांच्या लाभधारकांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी साधलेल्या प्रगतीची पाहणी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केली.

Image may contain: one or more people and outdoor

नाळेश्वर येथील श्रीमती कमलाबाई अण्णाराव धोतरे या प्रगतशील महिला शेतकरीने बायोगॅस योजनेचा लाभ घेतला. प्लॉस्टिक टाकीचा वापर करुन नवीन तंत्राने तयार करण्यात आलेल्या बयोगॅसचे युनिट व त्याचा उपयोग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. याचबरोबरच येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन घेतलेल्या शेततळ्याचे व त्यामध्ये पोकरा योजनेंतर्गत केलेल्या मत्स्यपालानाचीही पाहणी केली. मस्त्यशेती, रेशीम पालन, मधुमक्षीका पालन, सौर ऊर्जेवर आधारित शेतीपंप अशा शाश्वत शेतीपूरक योजनांवर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Image may contain: 1 person, standing, plant, tree, outdoor and nature

येथील प्रगतशील शेतकरी वाघ यांच्या शेतीला भेट देऊन त्यांनी सुधारित औजारे, रुंद सरी वरंबा पद्धतीने हरभरा पिकाची लागवड यांचीही पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर यांनी विकास कामांना त्यांना माहिती दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, तालुका कृषि अधिकारी सिद्धेश्वर मोकळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.