औरंगाबाद जिल्ह्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 44264 कोरोनामुक्त, 476 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 05 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 59 जणांना (मनपा10, ग्रामीण 49) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44264 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 60 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45949 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1209 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 476 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (46)भाग्यनगर (1), एन -2 सिडको (1), एन -8 सिडको (2), राजा बाजार (3), ब्ल्यु बेल्स, चिकलठाणा (1),जसवंतपुरा (1),मुकुंदवाडी (2),समाधान कॉलनी (1), उस्मानपुरा (2), धुत हॉस्पिटल (1), उल्का नगरी (1), त्रिमुर्ती चौक(1), पीएसबीए इंग्लिश स्कुल (1), लक्ष्मी नगर (1), हडको (1), कुशल नगर (5),कांचनवाडी (1),टेलिकॉम सो. (1),एन सहा (1), जाधववाडी (1), बीडबाय पास (1), एन -12 हडको (1), आंबेडकर नगर (1), अन्य (14)

ग्रामीण (14)सिडको महानगर (1), बजाजनगर (1), अन्य (12)