जालना जिल्ह्यात 26 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 5 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 28 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – जालना शहर -13, इंदेवाडी-1, सुरा-1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, लवणी -1, दुधा -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -2, घनसावंगी तालुक्यातील कंडारी खु -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -3, जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1, आरटीपीसीआरद्वारे 26 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 26 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19367 असुन सध्या रुग्णालयात- 111 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6724 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 280 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-102247 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-26 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13278 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-88588 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-54 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-6248

14 दिवस पाठपुरावादैनिक केलेल्या व्यक्ती- 14, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6331 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-1, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 1, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-2, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-111,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-28, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12688, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-239 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-351जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.