नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधितामध्ये 7 व्यक्तींची भर

दोन बाधित औरंगाबाद, यवतमाळ जिल्हयातील

नांदेड दि. 4 :- कोरोना बाधिताच्या संख्येत आज तब्बल 7 बाधित व्यक्तींची भर झाली असून नागरिकांनी काटेकोर दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 7 बाधितामध्ये औरंगाबाद येथील 1 पुरुष वय 43 वर्षे, यवतमाळ जिल्हयातील उमरखेड येथील 1 पुरुष वय वर्षे 74 तसेच नांदेड येथील नईआबादी शिवाजीनगर परिसरातील 5 बाधित व्यक्ती असून त्यापैकी 1 पुरुष वय 28 वर्षे आणि 4 स्त्री अनुक्रमे वय वर्षे 35 ,45,55,70 आहे.

सद्यास्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यातील एकुण बाधिताची संख्या आता 182 वर पोहचली आहे. यापैकी बरे झालेली बाधित व्यक्तींची संख्या 126 आहे. जिल्ह्यात गुरुवार 4 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 63 अहवालापैकी 49 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 7 बाधिताचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण बाधित संख्या आता 182 झाली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 व मुंबई येथे संदर्भित करण्यात आलेला 1 असे 2 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सद्यस्थितीत रुग्णालयात 48 बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. त्यातील 3 बाधिताची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52 व 65 वर्षांच्या दोन स्त्री बाधित तर 38 वर्षाचा एक पुरुष बाधित आहे.

आतापर्यंत एकूण 182 बाधितापैकी 8 बाधितांचा मृत्यू झाला असून 126 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 48 बाधितापैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 बाधित , एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 36 बाधित, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 4 बाधित व्यक्ती आहेत.

कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 41 हजार 978, घेतलेले स्वॅब 4 हजार 270, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 788, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 7, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 182, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 167, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 55, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 126, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 48, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 73 एवढी आहे.

दिनांक 3 जून रोजी प्रलंबित असलेल्या 111 स्वॅब तपासणी अहवालापैकी 63 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 48 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 4 जून रोजी 25 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

वाढत्या संख्येला अधिक घाबरुन न जाता जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *