औरंगाबाद जिल्ह्यात 71 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 44205 कोरोनामुक्त, 475 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 04 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 82 जणांना (मनपा 73, ग्रामीण 09) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44205 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 71 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45889 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1209 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 475 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (64) विष्णू नगर (1),चौधरी हेरीटेज (3), कुशल नगर (2), म्हसोबा नगर (2),सातारा परिसर (1),उस्मानपुरा (1), माऊली नगर (2), गारखेडा परिसर (1), दिशा संकुल (1), एन-8 सिडको (1), संजय नगर (1), साई नगर (3),समृद्धी नगर (1), एन-3 सिडको (1), मुकुंदवाडी (1), शिवेश्वर कॉलनी (5), हर्सूल (4), सुपर थर्टी इंग्लिश स्कुल (2), अन्य (31)

ग्रामीण (07)अन्य (07)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत पुंडलिक नगरातील 78 वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयात वैजापूर तालुक्यातील लक्ष्मी नगरातील 57 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.