56 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 44123 कोरोनामुक्त,  488 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 03 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 53 जणांना (मनपा 45, ग्रामीण 08) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 44123 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 56 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45818 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1207 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 488 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (46) पुंडलिक नगर (1), आदर्श कॉलनी, गारखेडा (1), आलोक नगर (1), विष्णू नगर (1), सूतगिरणी चौक (1), धूत हॉस्पीटल परिसर (2), मुकुंदवाडी (1), बीड बायपास (1), गणेश नगर (1), नाथ व्हॅली शाळा परिसर, पैठण रोड (1), दिशा चौक, गारखेडा (1), एन सात सिडको (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), एन अकरा, सुभाषचंद्र नगर (1), एन दोन एसटी कॉलनी (1), एन सहा साई नगर (2), हनुमान चौक, चिकलठाणा (1), जय भवानी नगर (2), शिवाजी नगर (1), माऊली नगर (1), साईकृपा कॉम्प्लेक्स, एन चार सिडको (1), पोलिस पब्ल‍िक स्कूल (2), एन नऊ पवन नगर (1), न्यू हनुमान नगर (1), सातारा परिसर (1), चिकलठाणा परिसर (1), आरेफ कॉलनी (2), राज नगर, शहानूरवाडी (3), अन्य (11)
ग्रामीण (10)पिशोर, कन्नड (1), एन दोन सिडको (2), वडगाव कोल्हाटी (1), सिल्लोड (1), अन्य (5)
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू खासगी रुग्णालयात 49 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.