डिसेंबर 2020 मधील जीएसटी महसूल संकलनाची  उच्चांकी पातळी

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2021

डिसेंबर 2020 च्या महिन्यात संकलित केलेला एकूण जीएसटी महसूल 1,15,174  कोटी रुपये आहे, त्यापैकी सीजीएसटी 21,365 कोटी रुपये आहे, एसजीएसटी 27,804 कोटी रुपये, आयजीएसटी 57,426 कोटी रुपये आहे (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या, 27,050 कोटी रुपयांसह ) आणि अधिभार  8,579 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 971 कोटींचा समावेश) आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत नोव्हेंबर महिन्यात दाखल झालेल्या जीएसटीआर -3 बी विवरणपत्रांची एकूण संख्या 87 लाख आहे.

सरकारने नियमित तडजोड  म्हणून आयजीएसटीमधून  23,276 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 17,681 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत.  डिसेंबर 2020 महिन्यात नियमित निपटाऱ्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळविलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी, 44,641 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 45,485 कोटी रुपये आहे.

जीएसटी महसुलात सुधारणेचा अलिकडचा कल पाहता, डिसेंबर 2020 महिन्यातील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसूलपेक्षा 12% जास्त आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल 27% जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल 8% जास्त होता,जीएसटी लागू झाल्यापासून डिसेंबर 2020  मधील जीएसटीचा महसूल सर्वाधिक आहे  आणि प्रथमच 1.15  लाख कोटींचा आकडा पार केला आहे.  आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन  एप्रिल 2019  मध्ये 1,13,866  कोटी रुपये होते.  एप्रिल महिन्याचा महसूल साधारणत: जास्त असतो कारण ते मार्चच्या विवरणपत्रांशी संबंधित असतात. डिसेंबर 2020 मधील महसूल मागील महिन्याच्या महसुलापेक्षा  1,04.963 कोटीपेक्षा जास्त आहे. गेल्या 21 महिन्यांतील मासिक महसुलातली  ही सर्वाधिक वाढ आहे. महामारीनंतर वेगवान आर्थिक भरारी आणि जीएसटी चुकवणाऱ्यांविरोधात  देशव्यापी मोहिमेचा एकत्रित परिणाम यामुळे करपालन  सुधारले आहे.