सीबीएससी दहावी व बारावी परीक्षा ४ मेपासून 

नवी दिल्ली ,३१ जानेवारी :केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज केंद्रीय परिक्षा मंडळाच्या परिक्षांचा तारखा जाहीर केल्या.10 वी व 12 वी च्या केंद्राच्या परिक्षा 4 मे 2021 ते 10 जून, 2021 या कालावधीत घेतल्या जातील व त्यांचे निकाल 15 जुलैच्या दरम्यान जाहीर होतील, असे पोखरियाल यांना सांगितले. बारावीच्या प्रयोगपरिक्षा 1 मार्च 2021 ला सुरू होतील अशीही माहिती त्यांनी दिली.

कोविड-19 महामारीमुळे विद्यार्थी, शिक्षक व शाळांना अकल्पित व अनिश्चित परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.  तरीही, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिक्षक अविश्रांत परिश्रम घेत आहेत. शिक्षकांचे परिश्रम व त्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेत, शिकवण्याच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल त्यांनी शिक्षकवर्गाची प्रशंसा केली.  डिजिटल माध्यमातून शिक्षणासाठी सरकारने विविध मंच आणि सामग्री उपलब्ध करून दिली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केलेल्या सूचनांचा विचार करून परिक्षांच्या तारखांसंबधी निर्णय घेतल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले.नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देत पोखरियाल यांनी मंडळाच्या परिक्षेत तसेच पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांना उत्तम यशाच्या शुभेच्छा दिल्या.