नांदेड जिल्ह्यात 42 कोरोना बाधितांची भर

नांदेड , दि. 31 :- गुरुवार 31 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 42 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 22 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 20 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 37 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 1 हजार 86 अहवालापैकी 1 हजार 37 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 467 एवढी झाली असून यातील 20 हजार 370 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 323 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 573 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 19, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, देगलूर कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 7, हैद्राबाद येथे संदर्भीत 1 असे एकूण 37 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 81 हजार 662एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 55 हजार 912एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 467एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 370एकुण मृत्यू संख्या-573उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंकआज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-634रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-323आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.