चिनी मांजावरील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी काय केले ?

औरंगाबाद खंडपीठाकडून विचारणा

औरंगाबाद , दि. ३१: चिनी, नायलाॅन मांजाने नाशिकमधील महिलेचा बळी गेला. तर नागपूरमध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यासंदर्भाने औरंगाबाद खंडपीठाने दाखल करून घेतलेल्या सुमाेटाे याचिकेवरील सुनावणीदरम्यान चिनी मांजावर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने किती ठिकाणी छापे मारले, किती गुन्हे दाखल केले, याचा अहवाल पाेलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व पाेलीस अधीक्षकांकडून मागवला आहे. 

खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. विभा कंकणवाडी यांच्यासमाेर सुनावणी झाली. या प्रकरणात न्यायालयीन मित्र म्हणून सत्यजित बाेरा यांना नियुक्त केले आहे. सुनावणीदरमयान नवी दिल्लीतील राष्ट्रीय हरीत लवादाच्या मुख्य पीठाने ११ जुले २०१७ राेजी दिलेल्या निर्देशाचे पालन हाेते का, अशी विचारणाही खंडपीठाने केली आहे. या प्रकरणात चिनी, नायलाॅन मांजाचे उत्पादन करणारे, विकणारे, विकत घेणारे यांच्याबाबतही कारवाईच्या दृष्टीने विचार हाेणे आवशयक असल्याचे सरकारी वकील डी. आर. काळे यांनी बाजू मांडताना सांगितले.