गंगापूर कारखाना गैरव्यवहार, अटकपूर्व जामीन तूर्त नाही

औरंगाबाद , दि. ३१:गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या ठेव रकमेत अफरातफर झाल्यावरून दाखल गुन्हयातील तीन आराेपींना अंतरिम अ्टकपूर्व जामीन मिळण्यासाठी खंडपीठाकडून दिलासा मिळाला नाही. या प्रकरणाची सुनावणी न्या. विभा कंकणवाडी यांच्यासमाेर झाली. मनाेरमा प्रमाेद काबरा, पारस अमृतलाल मुथा व विद्या अ्जय मुनाेत यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला हाेता.गंगापूर सहकारी साखर कारखाना अवसायनात निघू नये, यासाठी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी ९ काेटी रुपये डीटीआर न्यायालयात जमा केले हाेते. व्याजासह ही रक्कम १५ काेटी ७० लाख रुपये झाले हाेते. ही रक्कम सभासद नसलेल्या वरील गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींच्या खात्यावर जमा झालेली हाेती. नियमाप्रमाणे जे सभासद आहेत त्यांच्याच खात्यावर रक्कम जमा करता येते. मात्र, ठेव ठेवण्यासाठी साखर आयुक्तांची परवानगी घेतली हाेती का, अशी विचारणाही खंडपीठाकडून करण्यात आली. या प्रकरणात गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत बंब यांच्यासह साेळा जणांविरुद्ध कृष्णा पाटील डाेणगावकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करणयात आला आहे. यातील मनाेरमा काबरा, पारस मुथा व विद्या मुनाेत यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी खंडपीठात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी बाजू मांडली.