औरंगाबाद जिल्ह्यात 68 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,दोन मृत्यू

जिल्ह्यात 43875 कोरोनामुक्त, 469 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक,30 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 48 जणांना (मनपा 37, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43875 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 68 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45544 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1200 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 469 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा(60) भगवती कॉलनी (6), श्रेय नगर (1), एन-3 सिडको (1),एन-5 सिडको (1), चिकलठाणा (1),कटकट गेट (1),पुंडलिक नगर (1), एन-3 सिडको (1),भावसिंग पुरा (1), टी.व्ही. सेंटर (2),मिल्ट्री हॉस्पिटल परिसर (1),देवळाई रोड सातारा परिसर (1), क्रांती चौक (1), सिव्हील हॉस्पिटल (1),नागेश्वरवाडी (2), कांचनवाडी (1),चेलीपुरा (1),पडेगाव (1),गारखेडा (3),प्रतापगड नगर, सिडको (1), भानुदास नगर (1),मंजीत प्राईड (1), उस्मानपुरा (1),बीड बायपास (1), अन्य (27)

ग्रामीण (8) पाचोड, (2), रांजणगाव (1), अन्य (5)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

खासगी रुग्णालयातऊर्जा नगर, सातारा परिसरातील 60 वर्षीय पुरुष, राजा बाजार येथील 74 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा रुग्णालयात मृत्यू झाला.