औरंगाबाद जिल्ह्यात 43827 कोरोनामुक्त, 451 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 29 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 79 जणांना (मनपा 67, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43827 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 58 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45476 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1198 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 451 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे

मनपा(51) उल्कानगरी (4), कासलीवाल हौ. सोसायटी, सिडको (1), बालकृष्ण नगर, गारखेडा (1), जय भवानी नगर (1), चैतन्य हौ. सोसायटी (1),एन-4 सिडको (1), अन्य (42)

ग्रामीण (7) तालवाडगाव, सिल्लोड (1), अन्य (6)