औरंगाबाद जिल्ह्यात 43689 कोरोनामुक्त,499 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 27 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 71 जणांना (मनपा 55, ग्रामीण 16) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43689 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 64 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45386 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1198 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 499 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (51)भगतसिंग नगर (4), काल्डा कॉर्नर (5), कौशल नगर (5), एन चार स्पंदन नगर (1), टाऊन सेंटर (1), एन तीन सिडको (1), एन बारा सिद्धार्थ नगर (1), एन नऊ, एम दोन, हडको (1), उस्मानपुरा (1), मिलिनियम पार्क (1), एन बारा स्वामी विवेकानंद नगर (1), जाधववाडी (1), कासलीवाल पूरम (1), सातारा पोलिस स्टेशन जवळ (1), इटखेडा (1), आरेफ कॉलनी (1), दिशा संस्कृती सो., (1), कैलास नगर (1), नवनाथ नगर, हडको (1), अल्तमश कॉलनी (1), बजाज नगर (1), समता नगर (1), मुकुंद नगर (1), धूत हॉस्पीटल परिसर (1), गादिया विहार (1), समर्थ नगर (2), राम नगर (2), एन पाच श्री नगर (1), एन सात सिडको (1), एन अकरा सिडको (1), एन बारा भारतमाता नगर (1), सूतगिरणी चौक परिसर (1), गारखेडा (1), एन दोन सिडको (1), वसंत अपार्टमेंट सिडको (1), अन्य (3)

ग्रामीण (13)किन्नी, सोयगाव (1), खुलताबाद (1), नारायणपूर, गंगापूर (1), घालखेडी (1), अन्य (9)